तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

शेतकऱ्यांसह परभणीकरांच्या भाजीपाल्याचा प्रश्न...सोडवला


१५  हजार नागरीकांना आतापर्यंत भाजीपाला व फळांचे मोफत वाटप करण्यात आले आहे."

परभणी (प्रतिनिधी) :-
शेतकऱ्यांचा शेतमाल विशेषत: भाजीपाला हा कवडीमोल दराने त्यांना विकावा लागत आहे. मोठ्या मेहनतीने भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी करत असतो. परंतू या कोरोनाच्या काळात शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे. तसेच संचारबंदीमुळे कुणालाही घराबाहेर पडता येत नाही. याचा विचार करून मी स्वतः तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेवून तो नागरीकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम केवळ  लोकांनी टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी असल्याचे राहुल पाटील यांनी आवर्जून सांगितले.

राज्यावरील कोरोनाचे वाढते संकट पाहता लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी देखील कसरत करावी लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन ती सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे.  शेतकऱ्याकडून दररोज पंधरा टन भाजीपाला व फळे विकत घेतली जात असून ती परभणीवासियांना मोफत वाटली जात आहेत. १३  मे पासून भाजीपाला, फळं वितरणासाठी सात अॅपे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत सोशल डिस्टसिंगचा नियम पाळून दररोज तीन हजार नागरीकांना भाजीपाला घरपोच दिला जात आहे.

शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात प्रत्येकी पाच किलो भाजी व फळे पिशव्यामध्ये पॅकींग करण्याचे काम शिवसैनिकामार्फत केले जात आहे. परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर, लक्ष्मीनगर, त्रिमुर्ती नगर, सरस्वती नगर, विद्यानगर, नागसेन नगर, नानलपेठ, वडगल्ली, तेली गल्ली, भजन गल्ली, सुभाष रोड, प्रभावती नगर, पोष्ट कॉलनी, सहकारनगर, चिद्रवार नगर, इनायत नगर, ऑडीट नगर, गजानन नगर, विकास नगर, सिंचन नगर, येलदरकर कॉलनी, उघडा महादेव मंदिर परिसर, शिवराम नगर, दत्तनगर, शास्त्रीनगर आदी भागातील १५ हजार नागरीकांना आतापर्यंत भाजीपाला व फळांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment