तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

वाढदिवस नकरता, संकल्प ग्रुपला केली धान्याची मदत ; अमरसिंह ढाका यांचा आदर्श उपक्रमबीड (प्रतिनिधी) :-  बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मनी प्रमाणे आज स्वतःच्या लग्नाची 22 वर्ष पूर्ण करून यशस्वी जीवन जगत असलेले राज्य ओबीसी परिषदेचे संघटक तथा समाजसेवक अमरसिंह ढाका, पत्नी सौ.चारुशीला अमरसिंह ढाका, मुलगी कु. प्रांजल ढाका  यांनी वाढदिवसा वर होणारा खर्च टाळून गरजवंत, वयोवृद्ध, विधवा, हलाखीची परिस्थिती असणाऱ्या,गरीब, बीड शहरातील लोकांना अविरतपणे पंचेचाळीस दिवसा पासून मोफत डबा घरपोच वाटपचे काम करणाऱ्या संकल्प ग्रुप बीड केली मदत दिली आहे.

अमरसिंह धाकाने स्वतः पोस्टल कर्मचाऱ्यांची वर्गणी गोळा करून व त्यांच्या पतसंस्थेकडून निधी घेऊन जवळपास तीनशेच्या वर खऱ्या गरजवंतांना शोधून मदत केली आहे, त्यांचे हे गरजवंतांना मदतीचे अभियान चालूच आहे.

 लग्नाचा बाविसावा वाढदिवस त्यावर होणारा खर्च टाळून अमरसिंह ढाका व त्यांच्या कुटुंबीयांनी एक आदर्श घालून दिला आहे, कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात अनेकांचे रोजगार बंद आहेत व त्यांचे दोन वेळच्या अन्नाची देखील व्यवस्था ते करू शकत नाहीत अशांना गरजवंतांना बीड शहरातील  संकल्प ग्रुपच्या माध्यमातून दररोज 400  लोकांना जेवणाचा डबा मोफत पुरला जातो, त्यांना छोटीशी मदत म्हणून एक15 लिटरचा गोड तेलाचा डबा, गहू, तांदूळ व शेंगदाणे अशा स्वरूपाची मदत देण्यात आली. 
संकल्प ग्रुप बीडचा हा मदतीचा कार्यक्रम चालू राहावा या उदात्त भावनेतून संपूर्ण कुटुंबाला विश्वासात घेऊन वाढदिवसावर होणारा खर्च टाळून ही मदत करण्यात आली आहे या प्रसंगी अॅड.अभय मगरे, युवा नेते गोटू विर, गौतम कांबळे, मोठे बंधू सत्यनारायणा ढाका, वहिनी मंगेशा सत्यनारायणा ढाका, सुधीर माने, बाप्पा माने, विशाखा जाधव, इंजि. राहुल सोनवणे, मनोज बोराडे, अशोक चौरे, विलास जाधव, वैभव जाधव, प्रा. विद्या जाधव, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment