तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदपवाडी सज्ज ; गावावर आहे सी. सी. टी. व्ही. ची नजर, गावात प्रभावीपणे स्वच्छता मोहीम - अतुल मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदपवाडी ग्राम पंचायत सज्ज झाली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गावावर सी. सी. टी. व्ही. च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. गावात प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविली जात असुन सर्व गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपुर्ण गावाच्या सहकार्याने प्रयत्न असल्याचे सरपंच अतुल मुंडे यांनी सांगितले.
        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असुन गल्लोगल्ली कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. इंदपवाडीमध्ये एकुण 53 नागरीक बाहेरून आले त्यापैकी आता 17 जणांना क्वारंटाईन करून त्यांना शाळेत ठेवले आहे. बाहेरून आलेल्या सर्व नागरीक आणि ऊसतोड मजुरांची नागापुर आरोग्य केंद्राच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. तसेच क्वारंटाईन असलेल्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे.
       गावात अनेक उपक्रम राबविले जात असुन गावावर सी. सी. टी. व्ही. च्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. ग्राम पंचायत अत्याधुनिक करण्यात आली असून संपूर्ण संगणकीकृत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची उपासमार होऊ नये म्हणून सर्वांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षापासून वंचित असलेल्या नागरीकांनाही स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
      पोलिस आणि प्रशासनाकडून आम्हाला पुर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगून सरपंच अतुल मुंडे म्हणाले की, पोलीसांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे मात्र आता जास्त सहकार्याची गरज आहे. गावात रात्री नागरीक मोठ्या संख्येने एकत्र थांबुन सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांनी राउंड मारून या नागरिकांना ताकीद द्यावी असे ते म्हणाले.
         गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी उपसरपंच वैजनाथ मुंडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, आशा वर्कर मोहिनी मुंडे, तलाठी सतीश भिसेवाड, ग्रामसेवक लिंबोळे, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे सरपंचांनी सांगितले.

No comments:

Post a comment