तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

राजेश देशमुख यांच्या वतीने रोजा इफ्तार साहित्याचे घरपोच वाटपपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
राजेश देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने आज रोजा इफ्तार साहित्याचे मुस्लिम बांधवांना घरपोच वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा रमजान उत्सवावर निर्बंध आले आहेत. मुस्लिम बांधवांचा हा पवित्र महिना असतो. दरवर्षी राजेश देशमुख यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत होते. यंदाची परिस्थिती बिकट असल्याने रोजा इफ्तार पार्टी न ठेवता इफ्तार साहित्याचे घरपोच वितरण करण्यात आले.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आलेला रामजानला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या महिन्यात दरवर्षी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जायचे. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे रोजा इफ्तारीचे आयोजन कोणालाही करता आले नाही. राजेश देशमुख यांच्या वतीने दरवर्षी रोजा इफ्तारी आयोजित केली जायची. यावर्षी आयोजन न करता आल्यामुळे मुस्लिम बांधवांना साहित्याचे घरपोच वितरण करण्यात आले. विविध प्रकारची फळे, फराळाचे साहित्य आदीं समानांच्या किट मुस्लिम बांधवांना घरोघरी पोहच करण्यात आल्या.

No comments:

Post a comment