तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थी हतबल


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- येथे शिकत असलेले शेकडो विद्यार्थी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कोरोनाच्या महामारी संकटाने हतबल होऊन त्रस्त झाले आहेत, त्यामध्येच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ  येत आहे,
मार्च महिन्यात किंवा त्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार, दीनदयाल उपाध्याय, पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना,शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व अन्य शिष्यवृत्ती योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होऊन मिळत असतो, मात्र यंदा, जवळपास एक वर्ष पूर्ण झाली असून सुद्धा विद्यार्थ्यांना कोणत्याच शिष्यवृत्ती योजनेचा एक पैसे सुद्धा त्यांच्या खात्या वर जमा न होता, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हतबलता, नैराश्य व बिकट अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत यावर्षी मिळाली नसल्याने विद्यार्थी हा घटक फार मोठ्या संकटात सापडला आहे, याचे परिणाम पाहता, विद्यार्थी गुन्हेगारी व आत्महत्या यांसारख्या प्रकाराकडे जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, शासनाने योग्य व तात्काळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार,दीनदयाल उपाध्याय योजना व इतर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना थेट खात्यात जमा कराव्यात अन्यथा, या बंद च्या काळात विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत स्वतः वर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी मागे पुढे पाहणार नसल्याचे मत  विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
*प्रतिक्रिया*
२)अस्मानी संकटात सापडलो - सतीश भारसाकडे
मी विद्यापीठात शिकत आहे,मला मागील वर्षपासून स्वाधार मिळाली नाही, अभ्यासाकरिता पुस्तक नाहीत, मेससाठी पैसे नाही, गावाकडे काम धंदे नसल्याने घरचे पण पैसे पाठवत नाहीत, मला माझ्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सद्या सोय नाही.
२)शासनाने तात्काळ दखल घ्यावी - अभिजित इंगळे
आमच्या परीक्षा लांबल्याने, अभ्यास करण्यासाठी भरपूर प्रमाणात वेळ आहे,मात्र खायला काहीच नाही, आमच्या वर आजच्या घडीला उपासमारीची वेळ आली असून, पैसे नसल्याने  आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.कृपया शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.
३) स्वाधार आम्हाला आधार- प्रमोद धुळे
मी शिक्षण घेत असताना समाज कल्याणच्या स्वाधार योजनेकरिता पात्र लाभार्थी विद्यार्थी आहे,माझ्याकडे कडे रूमभाडे देण्यासाठी व जेवणासाठी पैसे नाहीत, माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे,मला शिष्यवृत्ती व स्वाधार यापैकी कोणताच लाभ मिळाला नाही, त्यामुळे मला अभ्यास नीट करण्यात लक्ष लागत नाही व नैराश्य आल्याने मला परीक्षा देण्याची इच्छा होत नाही.
४) आमच्याकडेही लक्ष द्या -दीपक भगूरे
मी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एक गरीब विद्यार्थी आहे, आई वडील यांना काम नाही, आमच्या भावंडांचे शिक्षण सुरू आहे, यातच आम्हला अजून शिष्यवृत्ती, स्वाधार व दीनदयाल उपाध्याय व इतर कोणत्याच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही, कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या परिस्थितीत शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमचा विचार करावा.

विवेक वानखडे,ऋषिकेश तायडे,पवन जाधव व वैभव कांबळे यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment