तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

बाभुळतेल येथे कुषी विभागामार्फत शेतकर्याना बाधांवर खत वाटप...!


शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर 

वैजापुर तालुक्यातील बाभुळतेल येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप-
कोरोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते व बियाणे पुरविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे गर्दी टाळण्यासाठी जिल्हा कृषी अधिक्षक तुकाराम मोटे व उप विभागीय कुषी प्रकाश देशमुख तालुका कुषी अधिकारी अनिल कुलकर्णी मंडळ कुषी आधिकारी आर आर शेजवळ एम एस गांगुर्डे जी.के ऐतलवाड कुषी सेविका काजल बस्ते यांनी पुढाकार घेऊन गावात शेतकऱ्यांचे गट तयार करून एकत्रित खरेदी व वाहतुकीचा उपाय काढला आहे. यातून गटांना एकत्रित खरेदीतून व वाहतुकीतून फायदा होऊन, तसेच कोरोना मुळे होणारा संसर्ग टाळणे शक्य होत आहे.

पंचायत समितीचे उपसभापती सदस्य राजेंद्र मगर सरपंच अनिल कुळधर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवुन शेतकर्याच्या बांधांवर खत योजने अंतर्गत सावता शेतकरी गट.बळीराजा.शिव गणपती.संत कुपाश्री गणेश भाजीपाला उत्पादक गटांना खत वाटप करण्यात आले 
या गटाने मागणी केल्याप्रमाणे खंडाळा येथील संजय कृषी सेवा केंद्र येथून 20.20.13.असा एकूण 90.66.मे 
टन खताचा पुरवठा लाॅक मधुन 250 शेतिकर्याना करण्यात आला
यावेळी शेतकरी गटाचे संजय भोपळे राधाकृष्ण सोनवणे प्रकाश जाधव किशोर जाधव गणेश सुर्यवंशी आजिबात सुर्यवंशी योगेश पवार आशोक दारवंटे सुधाकर सोले दत्त पवार डिगंबंर कुन्दे श्रीपती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.बांधावर खत पुरवठा करण्याच्या या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

No comments:

Post a comment