तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

जिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवा पालकमंत्र्यांनी दिले जिल्हा प्रशासनाला निर्देश !


 लॉकडाउन 4.0 चेही शासन निर्णयाप्रमाणे पालन झालेच पाहिजे..

बुलडाणा: 
बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्हाणपूर येथून जळगाव जामोदला व  मुंबईवरून मलकापूर पांग्राला पेशंट आढळून आला. त्यामुळे आता जिल्ह्याबाहेरून कोरोना जिल्ह्यात येत असल्यामुळे चहूबाजूंनी  सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तसेच त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावाही घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात भवनात आज शनिवार 16 मे रोजी दुपारी पालक मंत्री नामदार शिंदे यांनी तातडीच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी आर. जी. पुरी, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्याने कोरोना परिस्थिती आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे हाताळली व जिल्हा यातून मुक्तही झाला, मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनामुळे त्या जिल्ह्यांमधून बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश होऊ नये.. यासाठी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाअंतर्गत सध्या अनेक बाबतीत जीत ढील दिल्याचे दिसत आहे, त्यावरही नियंत्रण आणण्याचे गरजेचे असल्याचे ना. शिंगणे म्हणाले. उद्यापासून चौथ्या टप्प्याचं लॉकडाउन सुरू होत असून त्याचीही अंमलबजावणी शासन निर्देशाप्रमाणे झालीच पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

No comments:

Post a comment