तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

सोस-जोगवाडा येथील कॉरंनटाईन केलेल्या कुटुंबातील बालकाचा मृत्यू...!!जिंतूर प्रतिनीधी
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गावाकडून शहराकडे गेलेल्या मजुरांची गावाकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर सोस-जोगवाडा येथे एक कुटुंब पुणे भोसरी ऐथून मोटारसायकलने गावात आल्यानंतर त्यांना दि.14 रोजी गावातील जिल्हा परिषद शाळेत त्यांना कॉरंनटाईन करण्यात आले..दोन दिवस जिल्हा परिषद शाळेत राहिल्यानंतर त्यांनी स्वतःघरी कॉरंनटाईन होण्याची इच्छा दर्शविली आणि ते घरीच कॉरंनटाईन झाले देखील..
मात्र दिनांक 18 मे रोजी त्या कुटुंबातील लहान बालक 2 वर्ष याची प्रकृती चांगली नसल्याची त्याच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी गावातील आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र जोगवाडा येथे नेण्यात आले.तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून बालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिंतूरला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले.. तेथून त्या बालकांना जिंतूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्या डॉक्टरांनी बालकास मृत म्हणून घोषित केले.या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
         ही घटना घडल्यानंतर चारठाणा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची संपूर्ण टीम सोस-जोगवाडा येथे दाखल झाली. हे कुटुंब कॉरंनटाईन असल्यामुळे त्या बाळाच्या स्लॅबसाठी त्या बालकास व आई,वडीलांना  चारठाणा येथे नेण्यात आली. या सर्वांचे स्लॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. एका लहान बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे..

No comments:

Post a comment