तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 May 2020

सलोखा आणि बंधूभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करा :- राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख ईनायतुला





ताडकळस (दि. 25) रोजी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईद निमित्त सर्व समाजबांधवांना व कोरोना पासुन जनतेचे रक्षणासाठी रात्र दिवस कार्य करीत आहेत. त्या कोरोना योध्दा ना. शुभेच्छा दिल्या व सांगितले की . सामाजिक सलोखा, बंधूभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करावी असे आवाहन शेख ईनायतुला यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गेल्या दोन  महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे. याच काळात नागरिकांना विविध सण - उत्सव घरच्या घरी साजरे करावे लागले. गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास देखील सुरू होते. यादरम्यान मुस्लिम बांधवांनी नमाज, सहरी, इफ्तार आधी धार्मिक विधी घरच्या घरीच साजरा केले.
सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद - उल - फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. कोरोना विषाणूचा सर्वत्र झालेला शिरकाव व संभाव्य धोका लक्षात घेता, सर्व समाज बांधवांनी घरच्या घरीच ईद साजरी करावी. एकमेकांना  शुभेच्छा देण्यासाठी कुठेही एकत्र न जमता, मोबाईल फोन, सोशल मिडियासह अन्य माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनही    केले आहे.

रमजान ईद हा सामाजिक सलोखा, बंधूभाव वाढीस घालणारा एक सण आहे, आपल्या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून  ईद निमित्त पठण करण्यात येणारी नमाज कुटुंबासमवेत घरीच अदा करावी तसेच कोरोनापासून जगाची सुटका लवकरात लवकर व्हावी अशी दुवा  सर्वानी  करण्याचे आवाहनही केले आहे.

No comments:

Post a comment