तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

हिवरा गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन तर त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे बफर झोन म्हणून घोषित- जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड  (प्रतिनिधी) :-
माजलगांव तालुक्यातील हिवरा येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळुन आलेला आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार माजलगांव तालुक्यातील हिवरा बु. या गावापासून ३ कि.मी. परिसरातील (माजलगांव तालुक्यातील हिवरा बु., गव्हाणथडी ,काळेगांवथडी, डुब्बाथडी व भगवाननगर) हा परिसर कन्टेनमेंट झोन Containment zone म्हणून घोषित करण्यात येत आहे.
   
त्या पुढील ०४ कि.मी. परिसरातील (माजलगांव तालुक्यातील राजेगांव, सुर्डी, महातपुरी, वाघोरा, व वाघोरातांडा ) हि गांवे बफर झोन( Buffer zone )म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिचित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.
जिल्ह्यात  दिनांक १७ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

No comments:

Post a Comment