तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

सिंदफणेच्या त्रिवेणी संगमावर राजयोगचा मदतीचा हात ; कुंटुबियांना किराणा वाटपसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १८ _ तालुक्यातील सिरसमार्ग येथे असलेल्या सिंदफणा- डोमरी- इद्राबा नदीच्या त्रिवेणी सगंमावर बीड येथील राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून बावीस कुंटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात, अनेकावर संकट कोसळले आहे, ग्रामीण भागातील गोरगरीब व निराधाराचे यामुळे हाल होत आहेत. बीड येथील प्रसिद्ध उद्योजक, पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत यांनी राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून बीड परिसरात मदतीचा महायज्ञ अंखडीत तेवत ठेवला आहे, सामाजिक जाण आणि भान जपणारे नगरसेवक शुभम धूत हे गेल्या दीड- दोन महिन्यापासून, वाडया- वस्त्यावर, आदिवासी, पारधी वस्ती, तांडयावर व ग्रामीण भागात मदतीचा सेतू बांधत आहेत. सिरसमार्ग व परिसरातील काही गरजवंत, निराधार व गरिब कुटुंबाना मदतीची आवश्यकता माहिती सिरसमार्ग येथील पत्रकारांनी उद्योजक दिलीप धूत यांना दिल्यानंतर, धूत यांनी तातडीने मदतीचा खारीचा वाटा सिरसगावी पोहच केला.रविवारी सिरसमार्ग येथे सिदंफणा नदीच्या त्रिवेणी संगमावर व बाजार तळावर सोशल डिस्टन्स तसेच शासनाचे नियम पाळून, नगरसेवक शुभम धूत यांच्या हस्ते बावीस गरजू व गरीब कुटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात धूत यांनी राजयोगच्या माध्यमातून दिलेली मदत, अनमोल असल्याने, सिरसमार्गकरांनी मदतीबद्दल शुभम धूत व त्यांच्या टीमचे आभार मानले. सर्व नागरिकानी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन शुभम धूत यांनी केले.
      यावेळी पत्रकार उतम हजारे, अनिल जाधव, सुमीत तोष्णीवाल, विरेंद्र ओस्तवाल, राजदीप धूत, लक्ष्मण हजारे, जितेंद्र मगर, भारत मगर, अनिल मगर, शरद गंचाडे, प्रेमदास हजारे, भगवान उमाप, बापू मेंढके आदी उपस्थित होते.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a Comment