तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आ.रमेशअप्पा कराड गोपीनाथ गडावर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 'मी स्व. गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता आहे, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. आता मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून त्या काल माझ्या नेत्या, आज माझ्या नेत्या आहेत आणि उद्याही त्याच माझ्या ने त्या राहतील, असे उद्गार नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी काढले.
     विधान परिषदेवर आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम रमेश कराड हे आज गोपीनाथ गडावर आले. स्व. मुंडे च्या समाधीचे दर्शन घेऊन माध्यमाशी बोलताना आ. रमेश कराड म्हणाले की, मी गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता आहे, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली. साहेबांनी मला राजकीय जीवनात संघर्ष करायला शिकविले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी माझ्या राजकीय जीवनात स्व. मुंडे यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करत आलो आहे. सर्वसामान्य गोरगरीब, दिनदुबळे, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत संघर्ष केला आहे, त्या संघर्षाचं फळ म्हणून मुंडे साहेबांनी मी आमदार व्हावं म्हणून विधान सभेत दोन वेळा उमेदवारी दिली. त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये यश आले नाही. आता मुंडे साहेबांच्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माझ्या नेत्या पंकजा मुंडे असं म्हणत पंकजाताई काल माझ्या नेत्या होत्या, आज माझ्या नेत्या आहेत आणि उद्याही त्याच माझ्या नेत्या असतील. पक्ष नेतृत्वाला आज मला संधी द्यावीशी वाटली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझ्या तळागाळातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे कराडांनी या वेळी म्हटले.

No comments:

Post a Comment