तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

स्वस्त धान्य दुकानदार-दुर्लक्षित कोरोना वारियर्स क्रांतिज्योति फाऊंडेशनकडून स्वस्त धान्य दुकानदार श्रीकांत पाथरकर यांचा सत्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आज देशात सर्वञ कोरोना विरुद्ध लढाई चालु आहे. या लढाईत लढणारे आरोग्य खात्यातील ,पोलिस खात्यातील कोरोना योद्ध्यांप्रती समाजाने कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली परंतु  स्वतःचा जिव धोक्यात घालुन स्वस्तभावात,मोफत धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार माञ दुर्लक्षितच राहिले. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रांतिज्योती फाऊंडेशनचे  अध्यक्ष इंजि. सुनिल काळे यांच्या वतीने  परळी येथील स्वस्त धान्य दुकानदार श्रीकांतजी पाथरकर यांचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. स्वस्त धान्य  दुकानदारांनी प्रतिक्विंटल धान्यामागे फक्त ६०-७० रू. कमिशन घेऊन किंवा शासनाकडुन आलेले मोफत धान्य काहीही मोबदला न घेता गेल्या दोन महिन्यापासुन वितरीत केले. कोरोनाच्या भितीने किंवा पाठदुखी,कंबरदुखी काहीही झाले तरी या दुकानदारांनी गोरगरिबांपर्यंत ,गरजुपर्यंत धान्य पोहोचवण्याचे थांबवले नाही.या स्वस्त धान्य दुकानदारांमुळेच अनेकांच्या घरच्या चुली पेटल्या. श्रीकांत पाथरकर  यांचा सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार आहे  असे इंजि.सुनिल काळे यांनी सांगितले. याप्रसंगी गोविंद लोखंडे सर,सागर रायचुरकर,जगदिश वैद्य आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment