तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 May 2020

कोरोनाचे संकट राज्यासमोर असतांना आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त ; आरोग्य विभागात केरळमध्ये कर्मचारी भरती न करता स्थानिकांना प्राधान्य देऊन पदे भरावेत- भक्तराम फडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सेवा देण्यास फारसे उत्सुक नसतानाच वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवरही रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. सरकार वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरुन घेण्याची घोषणा करतय तर दुसरीकडे परिचारिकांची मेरीट लिस्ट DMER कडे तयार असताना त्यांच्या नेमणूकांना विलंब का होतोय.  आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी परिचारिका भक्तराम फड यांनी केले आहे.
          देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचे रूग्णालयात रूग्ण वाढल्यामुळे रूग्णालयात मोठ्या प्रमाणात फुल झाले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक विभागातील अधिकारी, कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. पण, आरोग्य खात्यात कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे आहेत त्या कर्मचारी यांच्या वर ताण वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये हजारो नर्सिंग स्टाफ आसताना  सुध्दा केरळमधुन नर्सिंग स्टाफ मागवण्याच ऐक पत्र व्हायरल होत आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये नर्सिंग स्टाफ मध्ये तिवृ नाराजी होत आहे आणी ती नाराजी सोशल मीडिया वर येत आहे आम्हाला कंत्राटी मध्ये भरती न करता कायमस्वरुपी भरती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला सध्या अर्ध निम्मे पगार दीली तरी आम्ही नोकरीत समावून घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे. आरोग्य विभागतील रिक्त जागेवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे तसेच तात्काळ जागाची भरती करून आरोग्य खात्यातील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भक्तराम फड यांनी केले आहे.
             कोरोना चे संकट राज्यासमोर असताना वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांची 528 पैकी 129 रिक्त पदे स्पर्धापरीक्षा होवूनही भरणे बाकी आहे. संपूर्ण राज्यामधून 28000 उमेदवारांनी ही स्पर्धापरीक्षा दिली होती. त्यामधून 2200 परिचारिकांची मेरीट लिस्ट वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तयार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधे तब्बल 3,500 परिचारिकांची पदे रिक्त असून ही संख्या सद्ध्यपरिस्थितीत खूप अपूरी आहे. सरकार वैद्यकीय क्षेत्रातील 30,000 पदे तात्काळ भरुन घेण्याची घोषणा करतय तर दुसरीकडे परिचारिकांची मेरीट लिस्ट DMER कडे तयार असताना त्यांच्या नेमणूकांना विलंब का होतोय. इतका महाराष्ट्रीयन स्टाफ नौकरी करण्यास तयार असताना त्यांना डावलून स्टाफ नसल्याचे कारण देत केरळच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून 100 नर्सींग स्टाफची मागणी केली आहे हे कितपत योग्य आहे..?? रिक्त जागेवर महाराष्ट्र राज्य सरकारने स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक विभागातील अधिकारी, कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. आरोग्य खात्यातील तात्काळ पदे भरलेतर कर्मचारी यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी तात्काळ. पदे भरावेत अशी मागणी परिचारिक भक्तराम फड यांच्यासह विकास डोईफोडे, शरद केन्द्रें, शामसुंदर सानप, महेश केदार, निवृत्ती चाटे, सिध्देश्वर मुसळे, सुरज गालफाडे, सचिन लहाने, निळंकट होळंबे  लक्ष्मण गाढवे.प्रितम साखरे  यांनी केले आहे.

No comments:

Post a comment