तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

धरणावरील मोटार पंपाच्या विद्युत झटक्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू ..लोणार :१७

तालुक्यातील हिरडव येथील पिता-पुञाचा  धरणावरील  मोटारीचा विद्यूत शाँक लागुन  लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी  घटना १७ मे च्या सकाळी  वाजेदरम्यान हीरडव शिवारात घडली.
सदर घटनेची माहीती  वाऱ्यासारखी गावात पसरल्याने गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली,हिरडव येथील जनार्धन निवृत्ती मैराळ वय ५० वर्ष व निलेश जनार्धन मैराळ वय ३४ वर्ष हे मोटार सरकवण्यासाठी धरणावर  गेले असता विद्युत शाँक  लागून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली.घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर पो.का.सुरेश काळे,दिपक केसकर पंचनामा करण्यासाठी हजर झाले होते. तूर्तास पोलीस तपासकार्य सुरु आहे,. विद्युत विभागा मुळे  उन्हाळी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असून यामध्ये शेतकऱ्यांना आपला जिव देखील गमवावा लागत असल्याचे अस्वस्थ चित्र आहे.

No comments:

Post a comment