तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 May 2020

बँक खात्यात पडून राहिलेली शिल्लक रक्कम शासन खाती जमा कराप्रतिनिधी
परभणी, दि. 26 :- कोव्हीड -19 या संसर्गजन्य आजारामुळे  सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या परिणामाबाबत वित्त विभाग शासन निर्णय दि. 4 मे 2020 अन्वये विविध उपाययोजना लागू केल्या असून सदरील शासन निर्णयात अनुक्रमांक 17 मध्ये प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या बँक खात्यात मोठया प्रमाणात न वापरता पडून राहीलेली शिल्लक रक्कम दि.31 मे 2020 पुर्वी शासनास समर्पीत करावी,असे न केल्यास सदर कार्यालयाची पुढील देयक पारीत केली जाणार नाही असे नमुद केले आहे. त्यानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, माहे जुन 2020 मध्ये प्रत्येक आहरण व संवितरण अधिकारी यांना त्यांच्या त्यामहिन्यातील प्रथम देयकासोबत त्यांच्या सर्व बँकखाते पुस्तकाची छायांकित प्रत व सोबतच्या नमुन्यातील हमी पत्र जोडणे अनिवार्य राहील.

कोषागार कार्यालयाने दि. 12 मे 2020 च्या परिपत्रकानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना या बाबत कळविले असून माहे जुन 2020 मध्ये सादर केलेल्या प्रथम देयकासोबत सर्व बँक खाते पुस्तकांची छायांकित प्रत व हमीपत्र देयकासोबत नसल्यास देयके पारीत केली जाणार नाहीत. याची नोंद सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी, असे कोषागार अधिकरी सुनिल वायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a comment