तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हळदीच्या इ-लिलावास प्रारंभसेनगांव/प्रतिनिधी:- सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने दि.15 मे शुक्रवार पासुन हळदीच्या इ-लिलावास प्रारंभ केला असून पहिल्याच दिवशी 106 लॉट(वक्कल ) चे  783 क्विंटल हळदीची ई-लिलाव झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत इ- लिलाव  सुरू करण्याबाबत वारंवार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.व्यापारी, प्रशासन तसेच मा. जिल्हा उपनिबंधक हिंगोली यांच्या सहकार्याने शुक्रवारी इ- लिलावा ची  सुरुवात करण्यात आली या बोलीमध्ये अनेक खेडोपाड्यातील  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. पहिल्या दिवशी जादा लॉट आल्यामुळे बोली कशी पार पडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु सर्व व्यवस्थित पार पडल्या ने आनंदाचे वातावरण होते,  तसेच येणाऱ्या अनेक चुका प्रशासनाने टाळल्या होत्या त्यामुळे बोली सुखरूप पार पडली होती. बाजार समिती सेनगाव ने covid 19 ची दक्षता म्हणून सोशल distancing साठी सर्वोत्तम असणारा हा पर्याय स्वीकारला आहे. यातून बाजार समितीत होणारी गर्दी टाळता येणार आहे.  दुपारी बारा वाजेपर्यंत येणाऱ्या  सर्व भुसार शेतमालाच  तसेच भुईमुंग शेंगा या शेतमालाचे लिलाव खुल्या पद्दतीने  होणार आहेत, दुपारी बारा वाजेपर्यंत येणाऱ्या हळदीचे ई-लिलाव लावले जाणार आहेत व शेतकरी बांधवांना त्याचा मेसेज येणार आहे तसेच व्यापाऱ्यांनाही इ बोली लावण्यासाठी कमीत कमी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे.
 कृषी उत्पन्न बाजार समिती यापुढेही येणाऱ्या सर्व हळदीचा लिलाव हा  इ-लिलाव  होणार आहेत,  त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की आपण हळद विक्री येताना सोबत पासबुक घेऊन यावे. यापुढे बाजार समितीत हळदीचे इ -लिलाव  होणार आहेत.या पुढे कोणतीही हळद खुल्या लिलावाने होणार नसून इ- लिलावाने पार पडणार आहे.शिवाय शेतकरी बांधवांनी ऑनलाईन बोलीचाच आग्रह धरावा.  इ लिलावात एका लॉट्स साठी (वक्कल )कमीत कमी सात ते आठ लोकांनी बोले लावलेले होते त्यामुळे बरेचजण हळद खरेदी करण्यासाठी जादा चे बोली लावत होते असे दिसून आलेले आहे. इ लिलाव  बाबत अडचणी असतील तर बाजार समितीचे  कार्यालयात संपर्क करावे.काल दिवसभर  इ लिलाव यशस्वी व्हावा या साठी सारे कर्मचारी, व्यापारी, झटताना दिसत होते.   बाजार समिती सेनगाव चे नाव इ लिलावात पहिले यावे यासाठी प्रशासन, बाजार समितीचे सर्व व्यापारी बांधव, कर्मचारी तसेच शेतकरी यांनी सहकार्य करावे असेही आवाहन बाजार समितीचे प्रशासक योगेश आरसोड व सचिव दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

No comments:

Post a comment