तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

बाहेरून जिल्हयात परतणाऱ्या व्यक्तींबाबत क्वाॅरन्टाईन करण्याच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे-मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार


बीड, (प्रतिनिधी) :- बाहेरील जिल्हे, राज्य व इतर शहरातुन जिल्हयातील गावात परतणाऱ्या मजुर , विद्यार्थी , प्रवाशी व इतर व्यक्तींकडून क्वाॅरन्टाईन  नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत सरपंच , ग्रामसेवक यांनी त्यांचे कर्तव्यात कसुर केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 ( 1 ) प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

क्वाॅरन्टाईन व्यक्तींकडुन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत खात्री करणेची जबाबदारी ही सरपंच , ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा पथक यांचेकडे सोपवली आहे .परंतु काही गावामध्ये सरपंच , ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा पथक सदस्य हे काही लोकांकडुन नियमाचे उल्लंघन झाल्यास दुर्लक्ष करीत आहेत. गावाचे आरोग्य व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी बीड जिल्हयात परतणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करणेबाबत ग्रामपातळीवरती जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे .

  बाहेरील जिल्हे- राज्य व इतर शहरातुन जिल्हयातील गावात परतणाऱ्या मजुर , विद्यार्थी , प्रवाशी व इतर व्यक्ती यांचे जिल्हा प्रवेशाबाबत  जिल्हाधिकारी बीड यांनी आदेश क्रं जा – 2020 आ.व्य . कोव्हीड 19 दिनांक 8.5.2020 अन्वये आदेश निर्गमीत केलेले आहेत .  त्या अनुषंगाने बीड जिल्हयात परतण्यासाठी दिनांक 14 पर्यंत जवळपास 6500 लोकांनी अधिकृत परवानगी मिळवली असुन साधारण 4200 नागरिक आजपर्यंत जिल्हयात परतले असुन या सर्वांना आरोग्य विभागाच्यावतीने पुढील 28 दिवसांसाठी होम क्वाॅरन्टाईन करण्यात आले आहे

  बाहेरील जिल्हयातुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ही सरपंच , ग्रामसेवक व ग्रामसुरक्षा पथकांची आहे . आपण आपले कर्तव्य चोख बजावुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य केल्यासच कोरोनाला गावापासुन दुर ठेवु शकतो . यापुढे सरपंच , ग्रामसेवक यांनी त्यांचे कर्तव्यात कसुर केल्याचे निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून सरपंचाविरूध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 ( 1 ) प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल . तसेच ग्रामसेवक यांचे विरूद महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( वर्तनुक ) नियम 1967 चे कलम 3 प्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे अजित कुंभार  मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, बीड यांनी आदेश दिले आहेत.

  राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करून खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे . बीड जिल्हयात केंद्र शासनाच्या भारत सरकार  गृहमंत्रालयाने व राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेशानूसार जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्ह्यात दिनांक 17 में 2020 रोजीचे रात्री १२.०० वा.पर्यंत  फौजदारी प्रक्रीया संहिताचे कलम १४४ (१) (३)  मनाई आदेश लागू केले आहेत.

No comments:

Post a comment