तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

शेतक-यांची आडवणुक करून बी -बियाणे विक्री करणा-या दुकानांवर कारवाई करा— अक्षय भुमकर


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- लाॅकडाऊनच्या काळात शेतकर्यांची खत, बी-बियाणे दुकानदारांकडुन होणारी बे भाव बि बियानांची विक्री करून केली जाणारी अडवनुक थांबवण्यात यावी व आशा दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंबाजोगाई युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी केली आहे.
    येत्या काही दिवसांत रब्बी पिकांच्या पेरणीसाठी सुरूवात होणार असुन या साठी लागणार्या खत, बी-बियाणांच्या खरेदीसाठी शेतकरी गावातून शेतीच्या बांधावरून बियाणे खरेदीसाठी शहरी भागांत येऊ लागले असल्याने लाॅकडाऊन च्या नावाखाली बि बियाणे विक्रीवाले दुकानदार बे भाव किंमतीने बियाणे विक्री करून शेतकर्यांची लुट करून अडवणुक करत आहेत. आशा वाजवी किंमतीने विक्री करून शेतकर्यांची अडवनुक करणार्या बीयाने दुकानदारांवर कडक कारवाईची मागणी अक्षय भुमक यांनी 
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या कडे केली असुन याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय बीड, उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई, व तहसील कार्यालय यांना सादर करण्यात आल्या असुन लवकरात लवकर यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी केली आहे.!

No comments:

Post a Comment