तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

शेंबा येथे त्या संशयित ट्रकमध्ये निघाली जनावरांची चामडी.. छुप्या मार्गाने ट्रक कोलकता जाण्याच्या तयारीत असताना
 गावकऱ्यांनी पकडला.

ट्रक चालक व सहकाऱ्यावर गुन्हे दाखल..

नांदुरा :-

14 मे रोजी सायंकाळी 6:30 ट्रक क्रमांक MH45AF0155 मलकापूर वरून मोताळा मार्गे छुप्या रस्त्याने संशयास्पदरित्या कोलकतासाठी जात असताना शेंबा बु ता नांदुरा हद्दीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थांबविला असता ट्रक मधून मांसाची दुर्गंधी येत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येताच जमलेल्या नागरिकांनी व गावातील पोलीस पाटील यांनी बोरखेडी पोलीस स्टेशनला कळविले,
सदर ट्रक हा रमेश बाळासो शिंदे नामक मालकाचा असून त्याने सांगितले की तो अकलूज वरून कांद्याची वाहतूकीचा परवाना काढून मलकापूर मध्ये आला तिथे त्याने ट्रक मध्ये जनावरांची कातडी चा माल भरून सदर ट्रक मोताळ्याकडे रवाना करून मोताळ्यातील एका ठिकाणी अजून जनावरांची कातडी ट्रक मध्ये भरून कोलकाता साठी सदर माल पोहचविण्यासाठी नेत आहे.
परंतु काही मोताळ्यातील व शेंबा बु येथील बजरंग दल कार्यकत्याना ह्या ट्रक बद्दल खबर मिळाली असता त्यांनी तो कातडी भरलेला ट्रक शेंबा बु येथे अडविला व पोलिसांना माहिती कळविली.

बोरखेडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री.रोकडे,शेंबा बिट श्री.मिलिंद सोनोने,श्री.वाघ हे घटनास्थळी सायंकाळी 7:30 वाजता पोहचले असता त्यांनी सांगितले की सदर ट्रक हा पंचनाम्यासाठी मोताळा येथे न्यावा लागेल व तिथे पंचनामा करून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले

त्यानुसार 15 मे रोजी सायंकाळी 6:35 वाजता सदर ट्रक मालक रमेश बाळासाहेब शिंदे (वय 31) रा.राजुरी ता.करमाळा जि. सोलापूर व क्लिनर ज्ञानेश्वर नानभाऊ इंचाळे (वय 25 वर्षे) रा.राणीवायगाव ता.परतूर जि. जालना यांचे वर कायपी अप क्र.208/2020 कलम 269,270,290,188,34 भादवि सह कलम 5(K) महाराष्ट्र प्राणिसंरक्षण सुधारणा अधिनियम 1995 गोवंश हत्या बंदी कायदा
अधिनियम 2015 तसेच सहकलम साथीचे रोगप्रतिबंधक कायदा 1897 तसेच कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

मलकापूर व मोताळा परिसरात एकही परवानाधारक कत्तलखाना नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल झालीच कशी?
सदर ट्रक मध्ये अंदाजे 25 टन चामडीचा माल भरलेला असून मलकापूर व मोताळा हद्दीद एकही परवानगीधारक कत्तलखाना नसताना एवढया मोठया प्रमाणात जनावरांची कत्तल झालीच कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*अकलूज येथील प्रशासनाने भाजीपाला वाहतूक अत्यावश्यक सेवेचा परवाना दिलाच कसा?*
सदर ट्रक चालकाने अकलूज वरून ट्रक भाजीपाला वाहतुकीचा परवाना घेऊन मलकापूर मध्ये दाखल केला,तिथे जनावरांची कातडी भरून वेगवेगळ्या पद्धतीने नकली पासेस तयार करून वाहतूक करत असल्याचा ध्यानात आले आहे.

याआधी जवळा बाजार येथील बैलजोडी चोरी प्रकरण उघडकीस..
जवळा बाजार येथील बैलजोडी चोरी झाल्याची तक्रार शेतकऱ्याने बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दिली असता पोलिसांनी कसून तपास केला तेव्हा मोताळा येथील अवैध कत्तलखाना येथे सदर बैलजोडीची शिंगे व कातडी आढळून आली असता गुन्हेगार पकडून वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हे दाखल केली होती.

No comments:

Post a Comment