तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

रविवारीही बँका खुल्या राहणार


बीड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील सर्व बँकांना बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी महत्वपूर्ण सूचना आज (दि.16) रोजी दिली आहे.

   जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वीच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व बँका विषम दिनांकास उघडतात. त्याप्रमाणे उद्या (दि.17) रोजी विषम तारीख असून रविवार येत असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी नवीन आदेशान्वये सुटी रद्द करत सर्वच् बँका खुल्या राहतील असे आदेशित केले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांसह सर्व बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून सुटीदिवशीही व्यवहार सुरळीत राहणार आहेत.

No comments:

Post a comment