तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेमार्फत गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप
आकाश लश्करे
उस्मानाबाद


कोरोणा विषाणू संसर्ग महाराष्ट्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची चिंता वाढत आहे शहरातून खेड्याकडे जनतेचा लोंढा येत आहे. यांच्यासोबत कोरोणा विषाणू संसर्ग गावात येईल या भीतीने लोक महिला भयभीत झाले आहेत. तसेच गाव पातळीवरील लीडर महिला घराघरातुन जनजागृती व नियमांचे काटेकोरपणे पालन कसे करावे लागते याचा प्रत्यक्ष डेमो देऊन महिलांना सतर्क केले जाते हे सामाजिक कार्य करताना त्यांना गावातील गरीब कुटुंबांना रोजगार मिळत नाही त्यामुळे काही कुटुंबाला उपासमारीचे वेळ आलेली त्यांच्या नजरेस आणि तेव्हा त्यांनी स्वयं शिक्षण प्रयोगच्या संचालिका प्रेमाताई गोपालन यांना कळविले तेव्हा ताईने गावातील गरजू व गरीब 25 कुटुंबाला अन्नधान्य किट वाटप करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील स्वयं शिक्षण प्रयोग टीमला सूचना दिल्या. त्यानंतर टीम ने गाव पातळीवरील किराणा दुकानदाराकडून 25 अन्नधान्य किट तयार करून घेतले त्यानंतर दिनांक 14-5-2019 रोजी सकाळी 9:00 वाजता गावाच्या चौकात दोन माणसातील सुरक्षित अंतर व तोंडाला मास्क व रुमाल बांधून व हातात हात मोजे घालून तसेच सॅनिटायझर चा वापर करून काटेकोरपणे नियमांचे पालन करून 25 गरजू व गरीब कुटुंबाला किटचे वाटप श्री. पोलीस पाटील अमोल बाचपल्ले, अंगणवाडी ताई सौ सुनंदा पांचाळ, सुनिता पांचाळ, अंगणवाडी ताई स्वाती जय शेट्टी, संवाद सहाय्यक सौ रंजना पांचाळ गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती श्री बब्रुवान बोरडे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे ट्रेनिंग मॅनेजर श्री राजाभाऊ जाधव माधव गोरकट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment