तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

इंदिरा गांधी स्कूलचे ऑनलाईन शिक्षण लवकरच प्रवेश प्रक्रिया - प्राचार्या बांगरसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १८ _ येथील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल मध्ये लॉकडाऊन च्या परिस्थितीत ही विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाईन शिक्षणप्रणाली द्वारे  शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये ,मुलांना घर बसल्या शिक्षण मिळावे हा शाळेचा प्रयत्न असून १५ मे पासून इयत्ता दहावी चे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय शाळेच्या प्रा. बांगर मॅडम यांनी घेतला आहे.
      यासाठी विद्यार्थ्यांना प्ल्ये स्टोअर वर जाऊन( दिक्षा) अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. यावर विद्यार्थ्याचे वर्गानुसार ऑनलाईन लेक्चर घेतले जातील व ग्रहपाठ तसेच प्रोजेक्टर द्वारे विविध शैक्षणिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्याचे शै.सातत्य टिकून ठेवण्यात येणार आहे. सुरळीत शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रमाची उजळणी पुन्हा घेतली जाणार असून ऑनलाईनद्वारे तारखेनुसार दिलेला स्वाध्याय शाळा सुरू झाल्यावर तपासला जाईल. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व कृतियुक्त शिक्षण मिळेल याकरिता शाळेच्या प्राचार्या बांगर मॅडम यांनी डोळ्या समोर ठेऊन निर्णय घेतला आहे.
          विशेषः इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडून ठेवण्यासाठी शाळेचे प्रशासक श्री. पठाण सर विद्यार्थ्या बरोबर चर्चा करून विषय शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देणार आहे. संस्थेचे सचिव डॉक्टर बांगर यांनी इतर वर्गासाठी सुध्दा या प्रणालीचा उपयोग केला जावा असे शालेय प्रशासनास सुचविले आहे. त्याच बरोबर शासन नियम व आरोग्याची काळजी घेत शाळेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेचे काम अंतिम टप्प्यात आहे, लवकरच ऑनलाईन प्रवेश सुरु होणार आहे. जर गरज भासली तर इतर वर्गासाठी सुध्दा याच धर्तीवर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येतील, यासाठी पालकांनी सहकार्य करावे व आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान  होऊ देऊ नये यासाठी सहकार्य करावे अशी विनंती शाळेच्या प्राचार्या भारती बांगर यांनी केली आहे.

╭══════════════╮
   🖋 सुभाष मुळे 🖋 पत्रकार
   !! _मो. 94 2224 3787_ !!
╰══════════════╯

No comments:

Post a comment