तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

बीड जिल्ह्यात आज लालपरी धावली परळीत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद;केवळ एकच बस धावली


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणी राज्यात चौ था लाॕकडाउन जाहिर करण्यात आला.राज्य सरकारने जिल्ह्या अंतर्गत बससेवा चालु करणार असा आदेश काढला आणी संपुर्ण राज्यभरासह बीड जिल्हयात ही बससेवा सुरु करण्यात आली.

दरम्यान बीड जिल्ह्यात याच आठवड्यात किरोनाच्या पॉझिटिव्हची संख्या 34 पर्यंत गेली आहे आणि अश्या परिस्थितीत सकाळी 7 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान एका तासाच्या फरकाने प्रवाशाच्या मागणी नुसार आज परळी आगारातुन दुपार पर्यत केवळ परळी अंबाजोगाई ही एकच बस प्रवासी घेऊन रवाना झाली.असुन आज जिल्ह्यात विषम दिवस म्हणजे लाॕकडाउनचा दिवस असल्याने नागरिक घरा बाहेर पडले नाहीत.शिवाय जिल्हा अंतर्गत का असेना पण प्रवासासाठी महामंडळा कडुन कुठलेच नियम जाहिर न केल्याने नागरिकात प्रवासा संबधी संभ्रम आहे.यामुळे लालपरी जिल्हा अंतर्गत धावणार पण कशी किंवा कोणाशी संपर्क साधायचा याबाबी स्पष्ट नसल्यामुळे प्रवासी पहिल्या दिवशी घरा बाहेर पडले नसावे म्हणुन आज दुपार पर्यत एकच बस परळी डेपोतुन सोडता आली आहे. दरम्यान आगार प्रमुख आर बी राजपुत यांनी सांगितले कि परळी आगारातुन एक तासांच्या फरकाने बससेवा सुरु करण्यात आली असुन प्रवाश्याच्या मागणी नुसार बस प्रवासासाठी सोडल्या जाणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment