तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 25 May 2020

कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांनी प्रशासनाला साथ द्या, घरी थांबा, सुरक्षित राहा, नियम पाळा व कोरोनाला टाळा- विशाल मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्याला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनास कळवावे, प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी प्रशासनाला साथ द्या, घरी थांबा, सुरक्षित राहा, नियम पाळा व कोरोनाला टाळा असे आवाहन विशाल मुंडे यांनी केले आहे.  लॉकडाऊन शिथिल केला म्हणजे कोरोना संपला असे नाही, त्यामुळे काळजी घ्या, सहकार्य करा असे त्यांनी सांगितले आहे. 
        कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पार्श्वभूमीवर  जिल्ह्याचे प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. कोरोना नियंत्रणात येण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे आणि त्यावर उपचारही सापडलेला नाही. नागरीकांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येणे आणि त्यासाठी प्रत्येकाने घरातच थांबुन कोरोना विरूद्धाची लढाई लढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे  असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. 
    कोरोनाच्या विषाणुने जगभरात नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकात धक्का निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनास कळवावे, प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी व शहरात व ग्रामीण भागात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. हे थांबलं पाहिजे, घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे, घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे,  सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगली पाहिजे. नागरिकांनी  गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं, यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं, नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जावून स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन भाजपाचे युवा नेते विशाल मुंडे यांनी केले.

No comments:

Post a comment