तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

शेतीच्या वादातून चौघांचा हल्ला ; महिलेसह दोघे गंभीर जखमी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शेतीच्या वादातून चौघांनी मिळुन महिला व मुलावर कुर्‍हाडीने हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना अंबलटेक येथे घडली असुन याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयकुमार गोविंद नागरगोजे, रा. अंबलटेक, ता. अंबाजोगाई हे आज दि. 14 मे रोजी सकाळी 10 वाजण्याचे सुमारास त्यांच्या आईसह शेतावर गेले असता तेथील विठ्ठल वाल्मीक नागरगोजे, वाल्मीक राजाराम नागरगोजे, व्यंकटी वाल्मीक नागरगोजे, बालाजी माणिक नागरगोजे यांनी आम्हाला विकलेली जमीन आत्ताच मोजुन दे असे म्हणत चौघांनी मिळुन विजयकुमार नागरगोजे व त्यांच्या आईवर काठी, कुर्‍हाडीने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
      याप्रकरणी विजयकुमार नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a comment