तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

मनिषा अव्हाळेची सातारा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती,वाशिम जिल्ह्यात मानाचा तुरा


मंगरूळपीर(फुलचंद भगत)-तालुक्यातील छोट्याशा सायखेडा गावची रहिवाशी असलेल्या मनिषा अव्हाळे यांनी युपिएससी मध्ये ऊंच भरारी घेतली असुन या यशाच्या जोरावर तिची सध्या सातारा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असुन वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
       लहानपणापासुनच स्पर्धा परिक्षेमध्ये जिद्द आणी चिकाटीने सातत्य ठेवून युपिएससीमध्ये घवघवीत यश मिळविले.या यशाच्या जोरावरच आज मनिषाची सातारा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली.मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा सारख्या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या मनिषाचे वडिल हे आदर्श शेतकरी असुन त्यांनी शिक्षणाला महत्व देत मुलीला शिक्षणासाठी वेळोवेळी प्रोत्साहित केले.घरच्यांचा आदर्श आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात मनिषाने शिक्षणात मार्गक्रमन केले आणी वरिष्ठ पद मिळवन्याच्या प्रेरणेने झपाटलेल्या वृत्तीने शेवटी हे स्वप्न पुर्ण केले.तिची नूकतीच सातारा येथे तिची अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाल्याने वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असुन तिचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment