तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

हिंगोली येथील अकोला बायपास परिसरात धमॕवीर संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त विविध कायॕक्रम संपन्नहिंगोली प्रतिनिधी 


         
  हिंगोली येथे  काल दि.१४ मेला शहरालगत असलेल्या अकोला बायपास परिसरातील शिवनेरी चौक,प्रविणनगर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने दरवषीॕ प्रमाणे याही वषीॕ पप्पुभाऊ मिञमंडळाकडुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
          अकोला बायपास बळसोंड परिसरातील शिवनेरी चौकालगत असलेल्या संभाजी महाराज चौकात प्रथम धमॕविर संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली.या ठिकाणी असलेल्या संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.यावेळी  शिवसेनेचे हिंगोली पंचायत समिती सदस्य  संतोष गोरे, ऊपसंरपंच किरण डहाळे,माजी संरपंच प्रकाश कावरखे,ग्रा.पं.सदस्य राजुभाऊ इंगळे,पञकार गोपालराव सरनायक ,बाळुअप्पा फंदे,शिवाजी डोम्पे,शाम कदम,ओम भिसे,अनिल गोटे,अनिल कोंढेकर आदीची उपस्थिती होती .
              *बळसोंड भागातील प्रविणनगर येथे  छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .* 
               या भागातील  प्रवीण नगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन विनायकराव भिसे पाटील व पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ढाले यांच्या हस्ते धमॕवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व रक्तदान शिबिराची फित कापुन करण्यात आले. हरिओम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंतर्गत हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी संस्था अध्यक्ष पप्पूभाऊ चव्हाण ,प्रवीण जाधव, पिंटू जाधव ,गजानन निर्मले साहेब ,बालाजी मोरे सर,ॲड . पंजाबराव पोहनकर,ॲड. अमोल जाधव ,कल्याणकर सर ,ग्रामपंचायत सदस्य सुमित घिके ,राजु पाटिल पंजाब गव्हाणकर,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .शिबिराची सुरुवात केली.  सध्या कोरोनासह पूरग्रस्त  इतर रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिरात जवळपास १०१ जणांनी रक्तदान केले.रक्त संकलित डॉक्टर स्वाती ,श्रीमती अनुराधा पत्रुड ,आत्माराम नितीन लांडगे ,सतीश कर्मचारी यांनी केले . पप्पू भाऊ चव्हाण मित्र मंडळासह, बजरंग दल व इतर सर्व विविध कार्यकर्त्यांनी भाग घेऊन हे शिबिरे पार पाडण्यास सहकार्य केले .हा कार्यक्रम शासनाने दिलेल्या सामाजिक अंतर तसेच मासवडी बाबीचा उपयोग करून संपन्न करण्यात आला.यामध्ये मराठा शिवसैनिक सेने चे कार्यकर्ते व सर्व समाजातील तरुण वर्ग उपस्थित होता व शासनाच्या सगळे नियम सांभाळून कार्यक्रम पार पडला.
बालाजी लाटकर ,राहुल धुळे, केवळ दाणेज ,सुनील बोडकेवार, राहुल वाघमारे ,रवी इंगळे, गोपाल चव्हाण ,भारत कदम ,मुकेश दाणेज ,पिंटू पिल्लू, संतोष गायकवाड, राजेश मोकाटे यांनी प्रयत्न केले.तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment