तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

परळी उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू दिन साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी उपजिल्हा रुग्णालय येथे बाह्य रुग्ण विभागत ”राष्ट्रीय डेंग्यू दिन” आज साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख व डॉ. तिडके यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. या वर्षीची थिम ”प्रभारी समुदाय गुंतवणुकी : डेंग्यू नियंत्रणाची की” नुसार व सोशल डिस्टन्सींग प्रमाणे रुग्णालयातील उपस्थितांना डेंग्यू ताप परसरविणारा एडीज एजीप्टाई डास, जिवन चक्रे रोग लक्षणे, व प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत व्यक्तीत व सामाजिक योगदानाचे महत्त्व या विषयी जन-जागृती पर आरोग्य शिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात सर्जे, शिंदे, सादेक व रुग्णालयातील स्टॉफ उपस्थितीत होते. या दरम्यान शहरातील भिमवाडी भागात आरोग्य शिक्षण देवून अॅबेटींग करण्यात आले.
सदरील राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्या करीता
आरोग्य पर्यवेक्षक सय्यद खदीर,आरोग्य कर्मचारी
अशोक औटी यांनी परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश कुरमे,बीड जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा साजेद बेग,सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी विजय शिंदे,व आ.स. मजीद यांचे तांत्रीक मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment