तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नगरपरिषद स्तरावर वॉर्ड निहाय सुरक्षा समित्या नेमाव्यात-प्रा. पवन मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राज्यात व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावा ला आळा घालण्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांची इत्यंभूत माहिती प्रशासनाकडे पोचण्यासाठी प्रशासनाने परळी शहरात नगरपालिका स्तरावर वॉर्ड निहाय सुरक्षा समित्या नेमाव्यात असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.
चालू परिस्थिती अनेक बाहेरगावी असणारे लोक शहरात दाखल झाले आहेत त्यातील काही नियमित तपासणी करून व प्रशासनाची परवानगी घेऊन तर बहुतांशी लोक हे जिल्हा प्रशासनाची बिगर परवानगी घेता शहरात दाखल झाले आहेत तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अशा अनेक पुणे-मुंबई व इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांमुळे विविध भागातील, गल्ली-बोळातील,वॉर्डातील  लोक भयबीत झालेले आहेत तरी या वर कंट्रोल आणण्यासाठी प्रशासनाने नगरपालिका मार्फत वॉर्ड निहाय सुरक्षा समित्या स्थापन करून वॉर्डात आलेल्या नवीन लोकांची माहिती घेऊन त्यांची रक्त तपासणी करून त्यांना कोरोनटाईन राहण्या संबंधी प्रशासनाने सूचना द्याव्यात अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment