तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या धान्य बँकेचा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरु - शिवदास बिडगर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याबरोबरच संपूर्ण देशावर कोरोना व्हायरस सारख्या महामारीच्या संकटाने थैमान घातले असून मागील दीड महिन्यापासून संपूर्ण देशभर लाॅक डाऊन घोषित करण्यात आला आहे. लाॅक डाऊनच्या बरोबरच संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे गोरगरीब रोजगारापासून वंचित आहेत अशा संकटाच्या वेळी महाराष्ट्रात अत्यावश्यक ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या धान्य बँकेच्या उपक्रम मार्फत राज्यभर राबवण्यात येत असून या उपक्रमा मार्फत धान्यपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम  राज्यातील उर्वरित भागात राबवणार असल्याची माहिती धनगर समाजाचे युवा नेते शिवदास बिडगर यांनी दिली.
       सध्या राज्यामध्ये कोरोना व्हायरस सारख्या महामारीने थैमान  घातले असून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यभर लाॅक डाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापार - उद्योगधंदे बंद आहेत. या कारणास्तव राज्यातील दररोज गोरगरिबांना मिळणारा रोजगार अचानक बंद झाला आहे. रोजगार बंद झाल्यामुळे दररोज मेहनत करून रोजगार कमावून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा गोरगरीब आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबियांना उपासमारीस तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील गोरगरीब संकटात असताना त्याची जाण धनगर समाजाचे जाणकार नेते उत्तमराव जानकर यांनी घेऊन त्यांच्या मदतीला धावून अन्नधान्याची बँक उघडून ती मोफत गोरगरिबांना वाटण्यासाठी सरसावले आहेत. माननीय उत्तमराव जानकर हे गोरगरीब जनतेच्या सुखदुःखाची जाण असणारे नेते आहेत. त्यामुळे दुर्लक्षित भागातील गोरगरीब उपाशी राहिला नाही पाहिजे असा संदेश देत ते गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत असेही शिवदास बिडगर म्हणाले.
      सध्या धान्य बँकेचा उपक्रम राज्यभर सुरू असून सताळा ग्रामपंचायत तालुका अहमदपूर येथे बालाजी बेकरे, लातूर येथे राजूभैय्या काळे, संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथे रमेशआण्णा ईलामे, धनगर मोहा ग्रामपंचायत तालुका गंगाखेड येथे रमेश खांडेकर सरपंच, धर्माबाद जिल्हा येथे दीपकभाऊ नरोटे, टेंभुर्णी जिल्हा जालना येथे दीपकभाऊ बोराडे, यांनी सर्व गरजू लोकांना धान्य वाटप केले असून राज्यातील गोरगरीब बांधवांना समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या बँकेमार्फत धान्याची किट वाटप उपक्रम सुरू असून ते अद्यापपर्यंत सुरूच राहील अशी माहिती शिवदास बिडगर यांनी दिली.

No comments:

Post a comment