तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

संचारेश्वर सामाजिक संस्था संचलित महाराष्ट्र इंग्लिश स्कूल मध्ये गरजुवंतांना तांदूळ वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. टाळेबंदीमध्ये अडकलेल्या नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संचारेश्वर सामाजिक संस्था संचलित महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या वतीने शाळेतील गरजुवंत पालकांना 5 किलो तांदळाचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. 

      आज दिनांक 19 मे 2020 वार मंगळवार रोजी महाराष्ट्र इंग्लिश स्कूलमध्ये गरजुवंत पालकाला प्रति किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता लाँक डाऊन मुळे अनेकांना अडचणी येत आहेत,  त्यामुळे शाळेतर्फे एक मदतीचा हात म्हणून गरजुवंत पालकांना प्रति पाच किलो जवळपास शंभर पालकांना तांदूळचे वाटप करण्यात आले, यावेळी शाळेचे अध्यक्ष / प्राचार्य सुनील जोशी सर तसेच झुंजार नेता चे पत्रकार अनंत कुलकर्णी सर आदमाने प्रीतम सर सुनील मस्के सर शाळेतील मावशी या सर्वांनी सोशल डिस्टंस्टींग चे पालन करून, पालकांना तांदळाचे वाटप केले.

No comments:

Post a comment