तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

जिल्ह्यासाठी पुढील १५ दिवस महत्वाचे, दक्षता घ्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक


 मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा

खरेदीसाठी गर्दी नको, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा

वाशिम, दि. १८ (फुलचंद भगत) : मुंबई, पुणे, औरंगाबाद यासह इतर महानगरातून व इतर जिल्ह्यांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आवश्यकतेनुसार त्यांना संस्थात्मक अथवा गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने पुढील १५ दिवस अतिशय महत्वाचे असून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिक, जिल्ह्यात परतलेले मजूर यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने ४ मे पासून अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह इतर काही दुकाने, आस्थापना उघडण्यास जिल्ह्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नये, तसेच अत्यावश्यक असेल तरच खरेदीसाठी घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क, रुमाल अथवा गमछा बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्यापही कायम असून योग्य खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment