तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

जिरेवाडी, बँक काँलनी, समतानगर येथील होम कोरोनटाईन व्यक्तींना बाहेर आल्यावर ग्रामदक्षता समितीचा कार्यवाहीचा इशारा


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनास कळवावे, प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी-कैलास फड

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जिरेवाडी गावात तसेच बॅंक कॉलनी व  समतानगर या भागात  बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तिंची प्रत्यक्ष पाहणी करुण त्यांना होमकोरोनटाईन असताना जर घराबाहेर पडलात तर सरळ कार्यवाही केली जाईल असा सूचना देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनास कळवावे, प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवा नेते कैलास फड यांनी केले आहे.

         परळी तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे जिरेवाडी गावात तसेच बॅंक कॉलनी व  समतानगर या भागात  बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तिंची प्रत्यक्ष पाहणी करुण त्यांना होमकोरोनटाईन असताना जर घराबाहेर पडलात तर सरळ कार्यवाही केली जाईल असा सूचना ग्राम दक्षता समितीद्वारे आज देण्यात आल्या. गावात व बँक कॉलोनी आणि समता नगर येथे बाहेर जिल्ह्यातून बरेच जण आल्यामुळे या सर्वजनांनी दवाखान्यात तपासणी करून घेतली का नाही त्याची प्रतक्ष पाहणी करून त्यांना डाँक्टरच्या सल्ल्याप्रमाणे होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आल्या. काही व्यक्ती होम कोरोनटाईन असताना घरात न राहता बाहेर फिरतात अश्या तक्रारी काही ग्रामस्थांनी केल्यानंतर आज पूर्ण गावात व वॉर्डात वाढत्या कोरोना उषाणूंचा प्रादूर्भाव संदर्भात जण जागरण करून लॉक  डाउन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या. या नंतर गावात ग्रामराक्षक कमिटी ची बैठक घेन्यात अली व बैठकी दरम्यान गावात अनोळखी व्यक्तींना न येऊ देने, बाहेर जिल्ह्यांतून परत आलेल्या व्यक्तींना तपासणी नंतरच गावात प्रवेश देने, गावतील दुकाना समोर सामाजिक डिस्टस चे नियम पाळणे व दिलेल्या वेळेतच दुकान चालू ठेवणे अश्या सूचना देण्यात आल्या यावेळी युवा नेते कैलास फड, तलाठी विष्णू गित्ते,पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, सरपंच गोवर्धन कांदे, उपसरपंच शिवाजी मुंडे  ग्रामपंचायत सदस्य नरेश मुंडे , विठ्ठल मुंडे , बालाजी मुंडे , भागवत मुंडे , गंपू मुंडे , भागवतराव कांदे , भानुदास पारधे  तसेच गावातील राहुल कांदे , ईश्वर कांदे , नानाभाऊ मुंडे , अंगद कांदे ,राजेभाऊ मुंडे , वसंत सावकार , निवृत्ती मुंडे , गणेश तांदळे, रामा कोतवाल, महादेव ढाकणे, अमोल तांदळे, प्रकाश मुंडे मामा, मयुर शेप, विकी डहाळे इत्यादी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment