तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 May 2020

विमा योजना चा लाभ घेण्यासाठी बँक खात्यात शिल्लक रक्कम ठेवा.मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र चे आव्हान

रिसोड - प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चा  वार्षिक हप्ता 25 मे ते 1 जून या कालावधीत आपल्या बचत खात्यातून ऑटो डेबिट पद्धतीने जात असतो.त्यामुळे आपल्या बँक खात्यामध्ये पुरेशी शिल्लक रक्कम  असणे आवश्यक आहे.अशी माहिती मनिवाइज केंद्र चे केंद्र व्यवस्थापक राजेंद्र पडघान व क्षेत्र समन्वयक किशोर चक्रनारायण ,संघपाल वाघमारे यांनी दिली आहे.9 मे 2015 पासून सुरू करण्यात आलेल्या योजना देशातील प्रत्येक बँक बचत खाते धारकासाठी उपलब्ध आहेत.प्रधानमंत्री सुरक्षा विमा हा अपघाती असून  वार्षिक 12 रु प्रीमियम अंतर्गत अपघाती मृत्यू च्या परिस्थिती त वारसाला 2 लाख रु लाभ दिला जातो.व प्रधानमंत्री सुरक्षा विमा वार्षिक प्रीमियम 330 रु मध्ये नैसर्गिक रित्या किंव्हा अपघाती मृत्यू समयी 2 लाख रु.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले आहे .मनिवाइज आर्थिक साक्षरता केंद्राने हा उपक्रम हाती घेऊन लोकांना बँकेबाबत माहिती द्यायला सुरुवात केली आहे.खातेधारकाना एप्रिल ,मे व जून तीन महिन्या करिता खातेधारकाना प्रत्येकी 500 रु दिले जात आहे ,तरी ते पैसे काढण्या साठी नागरिकानी घाई व गर्दी करण्याची काही गरज नाही असे आव्हान मनिवाइज केंद्र कडून करण्यात येत आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a comment