तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

परळी पोलिसांची दबंग कारवाई ; लाखो रुपयांचे गावठी दारू सह मुद्देमाल जप्तपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी शहर हद्दीतील वडसावित्री नगर भागातील नागरिकांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शहर पोलीस स्टेशन ला निवेदन दिले होते त्या निवेदनात येथील रहिवाशीयांनी येथील काही स्थानिक लोकांनी गावठी दारू बनून विकत असून त्याच परिसरात काही महिला वेश्या वृत्ती चा व्यवसाय करीत असल्यामुळे या भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत असे निवेदनात जवळपास 100 लोकांनी लिखित दिले होते. शहर पोलिसांनी या ठिकाणी एक चौकी स्थापन करून या ठिकाणी या अवैध हातभट्टी बनवने व विक्री  करणाऱ्या महानगाला वचपा बसण्यासाठी आज तब्बल 3 कार्यवाह्या करत 8 जाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये  पहिली कार्यवाही आरोपि सोबत 10 लिटर हातभट्टी दारू व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपी फरार असून या आरोपी विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,
तसेच दुसरी कार्यवाहीत याच परिसरात 15 किलो गुळ, हातभट्टी 15 लिटर एक आटो अंदाजे 33हजर,एवढा एकूण 34 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर तिसरी कार्यवाहीत 1400 लिटर दारुस पूरक असणारी रसायन ज्याची अंदाजे किंमत 71 हज्जर रुपयांचे हातभट्टी दारू साठी वापरण्यात येणारे रसायन तसेच मुद्देमाल एकूण अंदाजे 85 हज्जर रुपयांचा मुद्दे माल जप्त करून जाग्यावरच नष्ट करण्यात आला, आज 3 ठिकाणी याच भागात कार्यवाही करत या तिसऱ्या कार्यवाहीत 6 आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये आरोपीं विरोधात शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व डी वाय एस पी राहुल धस यांच्या मार्गदर्शना खाली शहर पोलीस स्टेशन च्या डी बी पथकांचे प्रमुख बाबसाहेब बांगर, हनुमंत मुंडे, भाताने, बीट जमादार लांडगे, व चट्टे यांनी मिळून ही धाडसी कार्यवाही केली. या कार्यवाहीने स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a comment