तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

आ.संजय दौंड यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य विभाग झाला सक्रियप्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाल्या किट ; शासकीय रुग्णालयाला मिळाला आरोग्य निधी

अंबेजोगाई, (प्रतिनिधी)-
कोरोनासारखी महामारीची लाट आली असताना अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी किट्स,मास्क नव्हते आमदार संजय दौंड यांच्या पाठपुराव्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य उपलब्ध झाले.घाटनांदूर येथील
दरगड बंधूनी किट्स देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दौंड यांच्या हस्ते घाटनांदुर,उजनी, धर्मापुरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरनांही किट्स मिळाल्यामुळे आरोग्य विभाग सक्रिय झाल्याचे
दिसत आहे.आमदार संजय दौंड अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते. दौंड कुटुंबाचा मुंडे कुटुंबाशी राजकीय कट्टर विरोधक म्हणून लोक त्यांच्याकडे पहात होते.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांची राजकारणाची सुरुवात ही जिल्हापरिषदेच्या राजकारणापासून झाली आहे. दोघांचेही आवडते पट्टीवडगाव जिल्हा परिषद सर्कल असून ना.धनंजय मुंडे यांनी संजय दोंड
यांचा थोडक्या मताने पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही नेत्याच्या समर्थकांनी सर्कलमध्ये केलेला राडा आजही लोकांच्या स्मरणात आहे.ना.धनंजय मुंडेचा जिल्हा परिषदमध्ये विजय झाल्यानंतर जिल्हा परिषद
मध्ये भाजपची सत्ता आली. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले.त्यानंतरच्या निवडणुकीत संजय दौंड यांच्या सौभाग्यवती आशाताई दौंड या काँग्रेस
पक्षाच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या व त्याही नंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या होत्या एक वर्षांपासून परळी मतदारसंघावर मुंडेंचा वरचष्मा असल्याने आता एकदा परळी विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून संजयभाऊ दौंड यांनी तयारी केली. मात्र तडजोडीत संजयभाऊ दौंड हे विधानपरिषदेचे आमदार झाले.परळी मतदारसंघातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दोघेही बहिण-भाऊ परळी शहरात राहतात.तर आमदार संजय दौंड आबेजोगाई शहरात राहत असल्याने त्यांना परळीकरांशी मधुर संबंध असले तरी आंबेजोगाईच्या राजकारणात ते तयार झाल्याने आमदार नसतानाही संजयभाऊ दौंड यांचा आरोग्य खात्याशी सतत संपर्क असायचा अनेक वेळा विविध समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेत असत त्यामुळे त्यांना आंबेजोगाईकर म्हणूनच जनतेत ओळख आहे. पालकमंत्री कोणीही असो परळीकर यांच्या मार्फत आंबेजोगाईकरांवर सतत अन्याय होतो अशी भावना आंबेजोगाईकरांची अनेक वर्षांपासून झाली होती.ना.धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर काय करतील आंबेजोगाईला न्याय देतील का ? का दुर्लक्ष करतील पालकमंत्री म्हणून ना. धनंजय मुंडे यांना आंबेजोगाई च्या शासकीय रुग्णालयाला काय काय देणे आवश्यक आहे याची कच्ची यादी आमदार संजयभाऊ दौंड यांनी यापूर्वीच पालकमंत्र्यांना दिली होती.मात्र योगायोग येत नव्हता.मांगवडगाव प्रकरणात पीडित यांना भेटण्यासाठी पालकमंत्री आंबेजोगाईला येणार असल्याचे समजल्यानंतर आ.संजयभाऊ दौंड यांनी मेडिकलला पालकमंत्री यांची भेट घडवून आणली परिसराची त्यांनी पाहणी करावी तसेच आढावा बैठक घ्यावी अशी विनंती करताच पालकमंत्री ना.धनंजय मुंडे म्हणाले भाऊ तुम्ही निर्णय सांगावयाचे पूर्तता मी,करावयाची एवढा दिलदारपणा पालकमंत्र्यांनी दाखवला.शासकीय
रुग्णालयातील इमारतीसाठी असो की,इतर लागणा-या अत्यावश्यक मशिनरी मागविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले निधीचा अक्षरशः पाऊस पडला असेच म्हणावे लागेल सर्वांत महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक असणारी एम.आर.आय.मशीन आंबेजोगाईला नव्हती त्याच्या खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध झाली.एवढेच नाही तर लोखंडी सावरगाव परिसरातील भव्य अशी
रुग्णालयाची इमारत उभी आहे.ही सुद्धा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते. आमदार संजयभाऊ दौंड यांचे फक्त आंबेजोगाईच्याच रुग्णालयावर लक्ष आहे असे नाही.तर परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर, उजनी,धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी कोरोना महामारीच्या काळात
इमाने इतबारे काम करत असताना त्यांना किट्स,मास्क आवश्यकता होती.घाटनांदूरच्या दरगड बंधूनी इच्छा व्यक्त केल्यानंतर किट्स व मास्क आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना
आमदार दौंड यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. आमदार दौंड यांनी आरोग्य विभागाकडे लक्ष दिल्याने त्यांना लागणा-या साहित्याची उपलब्धता करून देत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मिळणा-या आरोग्य सुविधा चांगल्या मिळत आहेत जनताही खुश आहे.आपल्या अनुपस्थितीत आमदार दौंड मतदारसंघाची काळजी घेत असल्याने पालकमंत्री ही दौंड यांच्यावर खुश असल्याचे समजते.

No comments:

Post a comment