तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

कोरोनाला हरविणयासाठी काही चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील -डाॅ. अरशद शेखपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  कोरोना  विषाणूला  हरवायचे  असेल तर  आता नागरिकांनी  काही  चांगल्या  सवयी लावून  घ्याव्या लागतील असे  प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डाॅ. अरशद  शेख यांनी केले. ते  परळी उपजिल्हा रुग्णालयात कोविड  19  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी  काळजी घ्यावी या  विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना  बोलत होते. 
   या  विषयी  चिञफितीसह  त्यांनी माहिती  देतांना  अनेक  महत्त्वपूर्ण बाबी  सांगितल्या. सर्दी, ताप, कोरडा  खोकला  ही  कोरोनाची  प्रमुख  लक्षणे आहेत हे सांगतानाच ज्या  व्यक्ती  ठणठणीत  दिसतात अशानाही कोरोना  होऊ शकतो. यावर जगात  अद्याप औषध अथवा लस तयार झालेली नाही त्यामुळे सावधानता  बाळगणे आणि त्याची तीव्रता कमी करणे हे आपल्या हातात आहे. 
    घराबाहेर जाताना मास्क वापरावा, सुरक्षित  अंतर ठेवून राहणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू  नये, बाहेरून  घरी  गेल्यावर चप्पल  बूट बाहेर सोडणे, अंगावरील कपडे धुवायला टाकणे, आपले हात  20 सेकंद साबणाने  स्वच्छ धुवून घेणे, घरी आणलेला भाजीपाला धुवून घेणे, मास्क वापरत असताना  सारखे तोंडाला, डोळ्याला  हात  लावू  नये अशा अनेक चांगल्या सवयी आता  लावून घ्याव्या लागतील असे ते म्हणाले. 
   शासन प्रशासन सर्व  प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर त्यांची सेवा  देत आहेत. पण कोरोनाला  हरवायचे असेल तर आता लोकसहभाग  महत्वाचा आहे असेही ते म्हणाले. 
   यावेळी जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड, जयवर्धने  सुर्यवंशी, महेश  मुंडे, रमेश सरवदे,जयपाल कांबळे  पञकार  बाबा शेख,संजय  व्हावळे  आदी उपस्थित होते. आभार भगवान साकसमुद्रे यांनी केले.

No comments:

Post a comment