तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

जानेवारी पासून रोखले शिक्षकांचे पगार


गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा मधील प्रकार

                    शिक्षकांना करावा लागतो मोठ्या अडचणींचा सामना

पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याची गरज

तेल्हारा : शहरातील गुरुकुल ज्ञानपीठ हि शाळा तालुक्यात नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाते. तसेच हि शाळा नेहमीच कोणत्या न कोणत्या चर्चेत असते. त्यामुळे याशालेबद्दल काही पालकांची नाराजी असल्याचे दिसून येते आता सर्वत्र कोरोनाने थैमान माजवले आहे त्यातच सर्व शाळा बंद आहेत. शासनाने सर्व शाळा महाविद्यालय, कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे  वेतन बंद न ठेवण्याचे आदेश दिले असतांनाच या शाळेने गेल्या जानेवारी पासून शिक्षकांचे वेतन रोखून ठेवल्याचे चित्र आहे.

              भारत सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व कंपन्या तसेच ठोक व्यापारांना आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद न ठेवण्याचे आदेश दिले असतांना शहरातील गुरुकुल ज्ञानपीठ या शाळेने आपल्या शाळेतील शिक्षकांचे वेतन गेल्या जानेवारी महिन्यांपासून रोखून ठेवले असल्यामुळे शाळेत असलेल्या शिक्षकांना वेतन न मिळाल्याने लॉकडाऊन मध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर बाब नित्याचीच असल्याचे लक्षात येते. यामुळे शिक्षकांना जर वेळेवर पगार न मिळाल्यास त्यांचे विद्यार्थ्यांना शिकविण्याची मानसिकता राहत नसल्याने आपल्या पाल्याला भरमसाट फी भरून सुद्धा हवे तसे शिक्षण मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर बाबीकडे पालकमंत्री वैयक्तिक लक्ष घालतील का असा पालकांसह शिक्षकांचा सवाल आहे आहे. जेणेकरून शिक्षकांचे वेळेवर पगार होऊन त्यांची विद्यार्थ्यांना शिकविण्याची मानसिकता चांगली राहून विद्यार्थ्यांना योग्य ज्ञानाचे धडे शिकविण्यात आनंद राहील. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासह पालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

No comments:

Post a comment