तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

मंगरुळपीर येथील आशा वर्कर्सना फेस शिल्डचे वितरण
वाशिम(फुलचंद भगत)-आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जावुन रुग्नांची नोंद घेवुन आणी माहीती संकलित करुन शासनाला पुरवन्याचे काम मंगरुळपीर तालुक्यातील आशा वर्कर्स करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दुृष्टिकोनातुन राष्टवादी काॅग्रेसच्या वतीने फेस शिल्डचे वाटप राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा आणी समाजसेविका ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करन्यात आले.
सध्या कोरोनाचे रुग्न आढळल्याने वाशिम जिल्हाही ग्रिन झोन मधुन आॅरेंज झोनमध्ये गेल्याने तसेच महानगरातील लोक,मजुर आपापल्या गावि परतत असल्यामुळे त्यांची माहीती संकलित करुन त्यांची नोद करन्यासाठी घरोघरी आशा वर्कर्सना जावे लागते.परंतु प्रशासनाकडुन त्यांच्या सुरक्षिततेची पाहीजे अशि व्यवस्था लावल्या गेली नव्हती.राष्टवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणी पदाधिकारी यांनी या आशांना फेसशिल्ड ऊपलब्ध करुन दिल्या असुन त्याचे वाटप मंगरुळपीर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात  राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते  आणी मान्यवरांच्या ऊपस्थितीत करन्यात आले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अरविंद भगत यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य सहाय्यक के.बि.भिवरकर,तालुका समुह संघटक महेश रोडगे,गटप्रवर्तक अर्चना ठाकरे,रोशनी मांडे,मंगला सावळे,वंदना मोडक यांचेसह आशा वर्कर्सची ऊपस्थीती होती.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment