तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद, परभणी. स्वच्छ भारत मिशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी आर्थिक मदत


------------------------------------
परभणी दिनांक 20 मे 2020
सद्यस्थितीत महाराष्ट्रभर कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून त्यांच्या उपचारासाठी स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने रुपये 17388 /- एवढी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छ भारत मिशन विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचे रुपये 17388/- एवढे वेतन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दिले आहे. रुपये 17 हजार 388 एवढा रुपयांचा चेक स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम व्ही करडखेलकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याकडे सुपूर्द केला.

स्वच्छ भारत मिशन विभागाच्या वतीने जिल्हाभर कोरोना आजाराच्या प्रादुर्भावापासून ग्रामीण भागातील नागरिकांचा बचाव होण्यासाठी स्वच्छाग्रहीना प्रशिक्षण, स्वच्छता चित्ररथ, आशाताई अंगणवाडी ताई आदींच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment