तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची नियमावली जाहीर आता लक्ष बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाकडे !


मुंबई दि.19 (प्रतिनिधी) राज्य सरकारने आज चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राज्यात केवळ दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. तर केवळ रेड आणि नॉन रेड झोनच ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही झोनमध्ये कन्टेन्मेंट झोन असणार आहे. 

- मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात
आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे. रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना 1+2 परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. हॉटेलना होम डिलिव्हरीची परवानगी नाही. मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

-नॉन रेड झोनसाठी मोठी सूट तर नॉन रेड झोनमध्ये नागरिकांना 22 मेपासून प्रशासनाची कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही. वैयक्तीक वापरासाठी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, सार्वजनिक ठिकाणे खुली होणार आहेत. मात्र, सांघिक वापर करता येणार नाही. हे सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरु ठेवता येणार आहे. नॉन रेड झोनमध्ये दुचाकी चालकच प्रवास करू शकणार आहे. तर तीनचाकींना 1+2 अशी परवानगी देण्यात आली आहे. चारचाकींनाही 1+2 परवानगी आहे. जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु होणार असून यामध्ये क्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यासंबंधीचे आदेश वेगळे काढण्यात येणार आहेत. तसेच सकाळीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व बाजारपेठा, दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. मात्र, जर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले तर मात्र प्रशासनाला सर्व अधिकार दिलेले आहेत.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाकडे लक्ष

राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11 करोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी 1 मयत असून सहा जणांना पुणे येथे हलवण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a comment