तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 May 2020

जिनिगवर कापसाच्या वाहनांच्या रांगा ; नंबर लागूनही पाच दिवस ताटकळत बसण्याची शेतकऱ्यांवर वेळ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
           उन्हाळा संपत आला असून पावसाळा तोंडावर आला. असे असताना गेल्या वर्षीचाच कापूस आणखीही काही शेतकऱ्यांचा घरातच आहे. तालुक्यातील जिनींगवर आँनलाईन नोंदणी केलेली असताना दरदिवशी ५० शेतकऱ्यांच्या कापसाचे मापे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नंबर आलेला असतानाही पाच पाच दिवस जिनींगवर ताटकळत बसावे लागते आहे. व्यापाऱ्यांच्या कापसाचे मात्र एकाच दिवसात मापे होत असल्याची तक्रार कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत.
              तालुक्यातील कौडगाव परिसरातील जिनींग व धर्मापुरी येथील जिनींगवर शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. सुरुवातीला कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शासनाने कापूस खरेदी बंद केली. काही दिवस गेल्या नंतर शेतकऱ्यांना आँनलाईन नोंदणी करुन एकाच जिनींगवर नंबर नुसार रोज २० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात असे. पण मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस राहिल्याने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे तालुक्यातील तीन जिनींगवर कापूस खरेदी करून रोज ५० शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करण्यात येवू लागली. यासाठीही आँनलाईन नोंदणी केल्यानंतर सिरीयल प्रमाणे टोकन नंबर देण्यात येवू लागले.यानुसार एका जिनींगवर ५० शेतकऱ्यांच्या कापसाचे मापे होणे आवश्यक असताना शेतकऱ्यांचा नंबर आल्यानंतरही चार ते पाच दिवस मापे होत नाहीत. शेतकऱ्यांना या जिनींगवर कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावर झोपावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कापसा ऐवजी व्यापाऱ्यांचा नंबर नसतानाही त्यांच्या कापसाचे एका दिवसात मापे होत असल्याची तक्रार कापूस उत्पादक शेतकरी करत आहेत. याकडे बाजारसमिती व पणन महासंघाने लक्ष देणे आवश्यक आहे. कारण पावसाळा तोंडावर आला असून पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे मापे होणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

गाढे पिंपळगाव येथील शेतकरी उदय राडकर यांनी सांगितले की, माझा नंबर मंगळवारी (ता.२६) आला म्हणून मी कापूस घेऊन आलो. पण चार दिवस झाले तरी आणखीही कापसाचे माप झाले नाही. मी मालवाहतूक करणारा अँटो किरायाने घेऊन आलो आहे. एका दिवसाच्या भाड्याऐवजी आता चार दिवस झाले.जेवढे दिवस होतील तेवढ्या दिवसाचे भाडे द्यावे लागणार आहे.तसेच एका दिवसात माप होयचे तर चार दिवस झाले तरी माप झाले नाही. शेतातील कामे सोडून इथे यावे लागत आहे.

No comments:

Post a comment