तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 29 May 2020

माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतीथी निमित्त सप्ताहाचे आयोजनपाच दिवस होणार ऑनलाईन किर्तने; मराठवाडा साथीच्या फेसबुक पेजवर होणार प्रक्षेपण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चारवाडीकर यांची येत्या ५ जुन रोजी पुण्यतीथी येत आहे. यानिमित्त दै.मराठवाडा साथीच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ जुन ते ०५ जुन च्या दरम्यान दररोज मान्यवर महाराजांची किर्तने आणि प्रवचने ऑनलाईन प्रसारीत करण्यात येणार आहेत. दै.मराठवाडा साथीचे फेसबुक पेज असनू, यावर दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत किर्तने सादर होणार आहेत.

दै.मराठवाडा साथी, बियाणी परिवार आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य दिव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे परिस्थिती बदलली असून, सप्ताहाची ही परंपरा कायम रहावी यासाठी हा किर्तन महोत्सव ऑनलाईन करण्यात येणार आहे. दि.०१ जुन ते ०५ जुन पर्यंत दररोज सकाळी ९ वाजता किर्तने होणार आहेत. दि.०१ जुन रोजी भागवताचार्य ह.भ.प.श्री.नामदेव महाराज फपाळ, दि.०२ जुन रोजी भागवताचार्य ह.भ.प.प्रशांत महाराज खानापूरकर, ०३ जुन रोजी रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा, दि.०५ जुन रोजी प.पु.ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले, तर दि.०५ जुन रोजी भागवताचार्य ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. http://www.facebook.com/marathwada-sathi या पेजवर सर्व किर्तनांचे ऑनलाईन प्रसारण होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे श्रवण प्रेक्षकांना घरबसल्याचे करता येणार असून, दररोज होणाऱ्या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment