तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 May 2020

पानकनेरगांव येथील एकमेव प्रशिद्ध असलेली मानकेश्वर रोप वाटीका लाॅकडाऊनचा फटका बसल्याने अर्थीक संकटात वाहतूक बंद असल्याने हजारो रोपे जाग्यावर पडून


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

...लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान

मराठवाडा ते विदर्भ प्रशिद्ध असलेली मोनकेश्वर रोप वाटीका संकटात


 राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलाव टाळण्यासाठी केन्द्र सरकारने
संचारबंदी घोषित झाल्याने लॉकडाऊनमध्ये रोपवाटिका धारकांचे मोठे नुकसान झाले आहे 

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील तयार असलेल्या रोपांना ग्राहकच नाही .
याच कारण दिड महिन्यांपासून लाॅकडाऊन घोषीत करण्यात आल्याने शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे 
वाहतूक व्यवस्थाही ठप्प असल्याने रोपवाटिकेतील सुमारे हजारोंची फळ झाडे व शोभेची रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे .
त्यामुळे हजारों रूपायांची  नुकसान होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे


 सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील मानकेश्वर  रोप वाटीका मराठवाडा ते विदर्भात ही प्रशिद्ध असलेली पानकनेरगांव येथील मानकेश्वर रोप वाटीका लाॅकडाऊनमूळे कचाट्यात सापडली आहे

महादेव जाधव यांचा १० वर्षांपासून असलेला रोप वाटीकेचा व्यवसाय करतात
दरवर्षी ते लाखोचे उत्पन्न मिळवतात पण मात्र आता
लाॅकडाऊनमूळे ३० हजारांच्या आतच उत्पन्न मिळल्याच ते सांगतात
 या मानकेश्वर रोप वाटीकेमध्ये झेंडू, फळ,गूलाब, जांब, डाळींब,आंबा, व तसेच मिरची, वांग, टमाटर, शिमला,कांदा  पप इ सर्व  जातीचे रोप तयार करून मिळत असल्याने शेकडो किलोमीटर अंतरावरून आर्डर प्रमाणे  विकत घेण्यासाठी येत असतात
पण मात्र आता या वर्षी लाॅकडाऊनमूळे बूकींग केलेली रोपे तसीच जाग्यावर पडून असल्याने शेतकर्यांचे अर्थीक संकटात सापडला असून मोठे नुकसान झाले आहे

 या ठिकाणी गेली १० वर्षांपासून रोपवाटिका व्यवसाय आहे. प्रामुख्याने या ठिकाणी अनेक जातीची रोपांची निर्मिती केली जात होती .याठिकाणी दरवर्षी सुमारे लाख रोपांची निर्मिती केली जाते .तसेच येथील रोपवाटीका धारकांनी विस्ताराने सर्व रोपे तयार करून आपल्या व्यवसायाला मोठे स्वरुप दिले जाते
 .या ठिकाणी लहान मोठ्या सुमारे ८ रोपवाटिका आहेत .येथील तसेच यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सुमारे ८० जवळपास आहे .तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ५० ते ६० महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध होत होता. त्यांचेही नुकसान झाल्याचे दिसून येते आहे
आपल्या व्यवसायात रोपवाटिका मालकांनी चांगली प्रगती साधली होती .मात्र,कोरोनाचा फैलाव झाल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहतूक बंद झाली .त्यामुळे रोपवाटिकाधारकांचा विक्रीचा माल वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील रोपांना विदर्भ ते मराठवाडा मधील  व  या ठिकाणी लोकांची मोठी मागणी असते. विक्रीचा काळ लोटलाअसल्याने केलेली रोपे फेकून द्यावी लागणार आहेत.
यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. तसेच नियमित विक्रीची लिंब,चिंच,अशोक, जांब डाळींब आंबा पंपई,
जांभूळ, बेहडा, हिरडा, बदाम,निलगिरी, बांबू, या शोभेच्या नाशवंत मालाचीप्रत खराब होऊन नुकसान सोसावे लागणार आहे. उन्हाळी हंगामात शोभेच्यारोपांना चांगली मागणी असते .पणलॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने माल पडूनराहिला आहे

उत्पादित मालाला प्रतिरोपाला संगोपन करताना मोठा खर्च येत आहे.रोपवाटिका धारकांनी हजारोंच्या पटीत माल तयार केला आहे. त्यामुळे लाखोंच्या पटीत रोपवाटिका धारकांचे नुकसान होत आहे


प्रतिक्रिया 

गेल्या दहा वर्षा पासून पाणी मुबलक प्रमानात असल्याने रोप वाटीका सुरू केली आहे दरवर्षी मे महीन्यात या रोपांची विक्री सुरू होते त्या प्रमाने आम्ही रोपे तयार करतो या वर्षी देखिल आम्ही रोपांची लागवड केली आहे मात्र गेल्या दोन महीन्यापासून लॉक डाऊन असल्यामुळे हा फटका रोपे विक्री ला बसला आहे 

महादेव जाधव रोप वाटीका चालक मु .पानकनेरगाव तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment