तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 24 May 2020

खताचे आणि बियाण्याचे अधिकृत भाव जाहीर करून विक्रेत्यांना पावती देणे बंधनकारक करा:-अॅड.विजय राऊत


हिंगोली/प्रतिनिधी
दि.24 मे जुन महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे आतापासूनच शेतकरी बांधव खत आणि बियाण्याची खरेदी करीत आहेत.शेतक-यांची कोणती ही लुट होणार नाही याकरीता तातडीने हिंगोली जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फेत सर्व खताचे आणि बि-बियाण्याचे अधिकृत भाव जाहीर करून सर्व विक्रेत्यांना पावती देणे बंधनकारक करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अॅड.विजय राऊत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
जुन महीन्यामध्ये खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे आज रोजी शेतकरी बांधव खत आणि बियाण्याची खरेदी करीत आहेत.परंतु हे खत आणि बियाणे शेतक-यांच्या बांधापर्यंत जाऊन वाटप करण्याचा शासनाचा उद्देश आहे.म्हणुन प्रहार जनशक्ती पक्ष हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या वतीने शेतक-यांची आर्थिक लुटमार होऊ नये म्हणून सर्व खत आणि बियाणे यांच्या अधिकृत किंमतीसह शेतकरी बांधवाना पावती देण्याचे जाहीर प्रगटन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फेत तातडीने देऊन सर्व वृत्तपत्रामध्ये आणि प्रसार माध्यमामध्ये प्रसिध्द करण्यात यावे.जेणेकरून कोणत्याही शेतक-यांची यामधुन आर्थिक लुट होणार नाही तसेच बियाणे हे बाद निघाले किंवा निष्क्रीय निघाले तर शेतक-यांना पुन्हा त्यामधुन त्यांची नुकसान भरपाई मागता येईल.याकरीता योग्य तो हमीभाव आणि बियाण्याच्या आणि खताच्या किंमतीसह शेतक-यांना पावती देण्यासाठी सक्तीच्या सुचना हिंगोली जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना देण्यात याव्यात.

No comments:

Post a comment