तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 May 2020

नाथ प्रतिष्ठान तर्फे धर्मापुरीत मुस्लीम समाज बांधवांना रमजान ईद निमित्त अन्न धान्याचे किट वाटप ; पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सामाजिक उपक्रमपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     जगभरात थैमान घातलेल्या कोरोना आजाराला रोखण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्नशील  असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा  धनंजयजी मुंडे साहेब हे आपल्या मतदारसंघात एकही गरीब व सर्व सामान्य माणूस उपाशीपोटी राहू नये याची काळजी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून पवित्र रमजान महिना सुरू असून चार दिवसांवर रमजान ईद सन येऊन ठेपला आहे लॉक डाऊन मध्ये मुस्लिम समाज बांधवांना ईद उत्साहात साजरी करता यावी  व जीवन आवश्यक वस्तूची कमतरता भासू नये म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब परळी मतदार संघातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी तेरा हजार किटचे वाटप करनार आहेत. यापैकी धर्मापुरी येथे 700 किट सरपंच तथा कृषी उत्पन्न परळी बाजार समिती चे सभापती म्हणून माझ्या हस्ते मुस्लिम बांधवाना  वाटप केले आले.

नाथ प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात गोरगरीबाचे सामुहिक विवाह सोहळे व विविध उपक्रम राबविले जातात आता कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्व सामान्यांसाठी धावून जात असताना नाथ प्रतिष्ठान ने रमजान ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांना मदतीचा हात दिला आहे या कार्यामुळे मुस्लिम समाज बांधवांतुन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबाचे कौतुक केले जात आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या काळात धर्मापुरी गावात शासन व प्रशासनाच्या आदेशाची काटेकोर पणे अमंलबजावणी करीत गावातील बाजारपेठ सामाजिक अंतर ठेवून लोकांची सुरक्षीतता राखली या कामाचे सर्व जनतेनं कौतुक केले.  परळी मतदार संघातील जनतेने मा धनंजय मुंडे साहेबांना विश्वास ठेवून  प्रचंड बहूमतांनी विजयी केले  व धनंजय मुंडे साहेबानी आपल्या कार्यातून हा विश्वास सार्थ ठरवला. जर यावेळेस जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पालक मंत्री असत्या तर जिल्यात कोरोनामुळे कमी तर चुकीच्या नियोजनामुळे जनतेची जास्त गैरसोय झाली असती. खऱ्या अर्थाने आमदार - खासदार - पालकमंत्री- सामाजिक न्याय मंत्री या सर्व जबाबदाऱ्या धनंजयजी मुंडे साहेब बीड जिल्याचे पालक म्हणून पार पाडत आहेत.

दरम्यान  केंद्र सरकारच्या वतीने लॉकडाऊन च्या कालावधीत स्वस्त धान्य दुकानांना धनंजयजी मुंडे साहेबांमुळे दोन महिन्यामध्ये दोन वेळा मोफत धान्य व रेग्युलर मापक दरातील धान्य दोन वेळा वाटप करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात गावातील सर्व गोर गरीबांना आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. हे सर्व धान्य  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.  
 यावेळी  माझ्यासोबत उपसरपंच खाजाभाई कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य - कैलास बागमारे, सिद्धेश्वर फड, अलाबक्ष पठाण , बाळू फड, बंडू पाटील, जयराम कासारे, वैजनाथ लांडगे, भिमा सावंत , फुलचंद फड, दिलीप फड, वैजनाथ फड, पांडुरंग फड आदी सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment