तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

स्वाभिमानी ने मानले शेतकऱ्यांचे आभार,जिल्हाभर करण्यात आला शेतकऱ्यांचा सन्मान


 बुलडाणा :- १६

                              जगभर पसरलेल्या कोरोना नावाच्या महाभयंकर संकटात ज्या प्रमाणे पोलिस बांधव,डाॕक्टर बांधव,नर्सेस.पत्रकार व सरकारी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे त्याच प्रमाणे जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी ही आपल्या जिवाची काळजी न करता रात्रंदिवस शेतात राबून अन्नधान्य उगावत आहे भाजीपाला काढत आहे व मिळेल त्या किमतीत व न मिळाले तरी ही मोफत काय होय ना अन्नधान्य भाजीपाला दूध सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत जेंव्हा संपूर्ण देश कोरोना सोबत दोन हात करत आहे तेंव्हा सर्वच कोरोना योद्धांचे आभार मानत असतांना मात्र शेतकरी हा नेहमीप्रमाणे वंचितच राहत आहे याची जाण होताच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने १६ मे रोज शनिवारला शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करुन शेतकऱ्यांचे आभार माणून सन्मान करण्याचे ठरविले ज्यामध्ये काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा.श्री राजु शेट्टी साहेब  रविकांत तुपकर यांनी आवाहन करत तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व संघटनेच्या कार्यकर्त्यांना आज दि.१६ मे रोजी सकाळी आपआपल्या शेतातून आपली शेतीकामाची औजारे हातात घेऊन पाच मिनीट आपण शेतकरी असल्याचा अभिमान आहे हे सांगून शेतकरी हि योद्धा अन्नदाता म्हणजे फुड वाॕरीयर असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन केले ज्याला संपूर्ण बुलडाणा जिल्हा व मेहकर तालुक्यातील भरपूर शेतकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात  हाकेला साथ देत आज मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतामधून हातात औजारे घेऊन आपण ही अन्नदाता असल्याचे जाणवून दिले ज्यामाध्ये मेहकर तालुक्यातील मादणी,आरेगाव,अंत्री देशामुख,कनका बृ.,शेलगाव देशमुख,डोणगाव,नागापूर,हिवरा खुर्द.घाटनांद्रा.शिवनी पिसा,पांग्रा डोळे,अंजनी बु! ,घाटबोरी,नायगांव देशमुख!मोळामोळी,दूर्गबोरी.आंधृड वासियांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले,जिल्हाउपाध्यक्ष अनिल बोरकर,युवा नेते नितीन अग्रवाल,मेहकर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,मा.उपाध्यक्ष विष्णू आखरे,सुभाष पवार,अमोल धोटे,गणेश जुनघरे,पप्पू देशमुख,डिगांबर सरकटे,सचिन मेंटागळे,बालाजी टाले,विष्णु धांडे,विजय आंंधळे,शब्बीर खाॕ.पठान,देवा आखाडे,गोपाल सुरडकर,कैलास उत्पुरे,सतीष वाघ,सुभाष पवार,गणेश चवरे,यांच्या समवेत मोठ्या संख्येने सामाजिक दूरी पाळत शेतकऱ्यांचे आभार माणून शेतकरी सन्मान दिन साजरा केला.


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment