तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

सेनगांव तालुक्यातील दाताडा(खु) येथे गॅस सिलेंडरचा स्फोट;शेतक-यांचे लाखोचे नुकसान,सुदैवाने जिवित हाणी टळली


 सेनगांव/प्रतिनिधी:- तालुक्यातील दाताडा(खु) येथे शेतक-यांच्या शेतातील गोठ्यात गॅस सिलेडंरचा स्फोट झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली असुन सुदैवाने जिवित हानी टळली. 
दाताडा(खु)येथील शेतकरी गणेश कोंडबा काळे हे लाॅकडाऊन असल्यामुळे आपल्या कुटूंबासह व दोन मुली व जावाई यांच्यासह गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतात एका कोठ्यात राहत होते.पाव्हुणे यांना चहा करण्यासाठी गणेश काळे यांच्या पत्नीने गॅस सिलेडंर चालु केला असता अचानक सिलेडंरने पेट घेतल्याने त्या गोठ्या बाहेर आल्या त्याच क्षणी गॅसचा प्रचंड स्फोट झाला.यामध्ये काळे कुटुंबियांचे सर्व संसारोपयोगी साहीत्य,गोठ्या वरील पत्रे व काळे यांच्या दोन दुचाकी मोटारसायकल व दोन जावाई यांच्या दोन दुचाकी मोटारसायकल जागीच जळुण खाक झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले असुन जिवित हानी मात्र सावध असल्याने टळली.त्यांचे दोन जावाई हे सेनगांव तालुक्यातील आहेत.हि घटना कळताच परीसरातील शेतक-यांनी आग विझवण्यासाठी मदत केल्याने आग लवकर आटोक्यात आली.गणेश काळे यांच्याकडे 5 एकर कोरडवाहू जमिन असल्याने ते कसेबसे संसाराचा गाडा लोटण्याचे काम करीत असतांना हे संकट ओढवल्याने अधिकच संकटात सापडले असुन या गॅसस्फोटात त्यांचे संसारोपयोगी सर्व साहीत्य आगीत खाक झाले असुन त्यांना शासनाकडुन त्वरीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परीसरातुन होत आहे. आतापर्यंत घटनास्थळी प्रशासनाचे कोणते ही अधिकारी व कर्मचारी आले नव्हते.

No comments:

Post a comment