तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती


प्रतिनिधी
परभणी, दि.19 :- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीतासंदर्भात नोंदी ठेवणे,  कोरोना (कोव्हिड -१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व त्याअनुषंगाने इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकामी परभणी जिल्ह्यात तालुक्यातील प्रत्येक गावासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.
         नोडल अधिकाऱ्याची गावनिहाय नावे व भ्रमणध्वनी क्रमांक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ https://parbhani.gov.in यावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 परभणी जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये परभणी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्याचप्रमाणे यामध्ये बेकायदेशीर अथवा अत्यावश्यक सेवेच्या वाहनातुन नागरिक प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. तरी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा संकेतस्थळावरील भ्रमणध्वनीवर अथवा नियंत्रण कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालय क्रमांक ०२४५२-२२६४००, ०२४५२-२२३७०२ , मो.९९ ७५०१३७२६ यावर अनाधिकृतरित्या व अधिकृतरित्या बाहेर गावाहून आलेल्या इसमांची माहिती त्वरित द्यावी. असेही कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a comment